धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर एन एस एस चा एक दिवसीय कॅम्प मोहमांडली येथे संपन्न इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) दि. ,9 सप...
धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर एन एस एस चा एक दिवसीय कॅम्प मोहमांडली येथे संपन्न
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
दि. ,9 सप्टेंबर 2025 रोजी धनाजी नाना महाविद्यालय, फैजपुर एन एस एस चा एक दिवसीय कॅम्प मोहमांडली ता- रावेर येथे संपन्न झाला. याप्रसंगी एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. सतीश दत्तात्रय पाटील, सहायक कार्यक्रमाधिकारी प्रा. विकास वाघुळदे, महिला कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. सविता वाघमारे, अर्थशास्त्र विभागाचे प्रा. विवेक महाजन व एनएसएसचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा मोहमांडली ता- रावेर चे मुख्याध्यापक श्री. आर. टी. कुमावत यांनी एनएसएस च्या एक दिवसीय कॅम्पचे स्वागत केले. प्रसंगी प्रा. डॉ. सतीश पाटील यांनी आपले प्रास्ताविक मांडले. प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा मांडली चे मुख्याध्यापक श्री आर. टी. कुमावत यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. एनएसएसच्या स्वयंसेवकांनी अंधारमळी, तीळ्या व मोहमांडली येथे स्वच्छता अभियान, प्लास्टिक मुक्त अभियान व तंबाखू मुक्त अभियान राबविले. स्वयंसेवकांनी अंधश्रद्धा निर्मूलन वर आधारित पथनाट्य ही सादर केले. तसेच सूत्रसंचालन कीर्ती महाजन व आभार प्रदर्शन रोहिणी माळी ने केले.


No comments