adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय येथे शिक्षक दिन साजरा!... विद्यार्थ्यांनी दिली शाळेला राजमाता माँसाहेब जिजाऊ यांची प्रतिमा भेट !....

 इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय येथे शिक्षक दिन साजरा!... विद्यार्थ्यांनी दिली शाळेला राजमाता माँसाहेब जिजाऊ यांची प्रतिमा भेट !.... धरणगाव ...

 इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय येथे शिक्षक दिन साजरा!...

विद्यार्थ्यांनी दिली शाळेला राजमाता माँसाहेब जिजाऊ यांची प्रतिमा भेट !....


धरणगाव प्रतिनिधी -

संपादक हेमकांत गायकवाड 

धरणगांव - शहरातील इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय धरणगाव येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षक दिनाचे औचित्य साधून वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांनी आज संपूर्ण शाळेचा कारभार सांभाळला. मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक - शिक्षिका व सेवक अशा सर्व भूमिका विद्यार्थ्यांनी पार पाडल्या.


       कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या विद्यार्थी मुख्याध्यापिका चैताली वाल्मिक होत्या.  प्रमुख अतिथी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.एस.एस.पाटील व पर्यवेक्षक ए. एस.पाटील होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले, डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.विद्यार्थी शिक्षकांनी सर्व सन्माननीय गुरुजनांना महापुरुषांचे ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. शाळेला राजमाता मासाहेब जिजाऊ यांची प्रतिमा विद्यार्थ्यांनी भेट दिली.

           यानंतर मिलिंद कोल्हे याने सावित्रीमाईंच्या जीवनावर प्रकाश टाकला. विद्यार्थी शिक्षक आकांक्षा गुंजाळ,धनश्री पाटील,चैताली पाटील,जयश्री चौधरी,प्रिया पाटील , राज पाटील, पुरुषोत्तम पाटील, सिद्धार्थ बैसाणे, उमेश महाजन, यश जाधव, यांनी शाळा चालविण्याचा अनुभव कथन करून आपले मनोगत व्यक्त केले.

         मुख्याध्यापक सौ.एस.एस.पाटील व पर्यवेक्षक ए. एस.पाटील यांनी महापुरुषांचे जीवनपट उलगडून त्यांचे सामाजिक - शैक्षणिक कार्य सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष चैताली वाल्मिक यांनी एका दिवसासाठी बनलेल्या मुख्याध्यापकाचे महत्व सांगितले. आज आम्ही सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने शाळेचे कामकाज पाहिले याचा सर्वांना मनस्वी आनंद आहे ही संधी आमचे मुख्याध्यापिका सौ. एस.एस.पाटील यांनी उपलब्ध करून दिली त्यांचे आम्ही सर्व विद्यार्थी ऋण व्यक्त करत शिक्षक दिनाचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकांक्षा गुंजाळ व अश्विनी पाटील यांनी केले तर आभार जयश्री चौधरी हिने मानले.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी इयत्ता दहावी चे वर्गशिक्षक शशिकांत पाटील, सौ.कीर्ती मराठे,सौ.ज्योती चौधरी यांनी मेहनत घेतली

No comments