जनता हायस्कूल साकरी येथे आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिवस साजरा मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड (संपादक -:- हेमकांत गायकवाड) ग्राम विकास...
जनता हायस्कूल साकरी येथे आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिवस साजरा
मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
ग्राम विकास मंडळ संचलित. जनता हायस्कूल साकरी ता. भुसावळ जि.जळगाव येथे दिनांक :-२९/०९ /२०२५ वार सोमवार येथे आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिवस साजरा करतांना माहिती अधिकार तालुका संघटक श्री.गौतम एकनाथ वानखेडे(उपशिक्षक ज.हा.साकरी) त्याप्रसंगी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना माहिती अधिकार म्हणजे काय.या विषयावर मार्गदर्शन करतांना. आपल्या देशाच्या लोकशाहीसाठी कसा फायदा होईल तसेच सर्व क्षेत्रातील शासकीय कामात कशी पारदर्शकता निर्माण होईल आणि प्रत्येक भारतीय नागरिकांना माहिती चा अधिकार कसा सोपा जाईल अश्या सर्व विषयावर विद्यार्थ्यांमध्ये माहिती अधिकारा बद्दल जागृती निर्माण होईल व प्रत्येक नागरिक जागृत होऊन प्रत्येका भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकार ,मुलभूत कर्तव्याचे पालन करुन देशाला लागलेली जी भ्रष्टाचाराची कीड आहे ती थांबवता येईल आणि आपला देश कसा भ्रष्टाचार मुक्त होईल.आणि शासकीय कामात कशी पारदर्शकता आणता येईल यासाठी प्रत्येक भारतीय नागरिकांनी माहिती अधिकाराचा अभ्यास करावा .या प्रसंगी उपस्थित शाळेचे ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष. व पदाधिकारी तसेच मुख्याध्यापक,पर्यवेक्षक श्री .डी.बी. राजपुत .पवार सर .आर के.पाटीलसर. चव्हाणसर सर्व शिक्षक शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .
No comments