अवैध गुटखा रॅकेटचा पर्दाफाश...स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई..3 आरोपी जेरबंद..लाखोंचा मुद्देमाल जप्त सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमका...
अवैध गुटखा रॅकेटचा पर्दाफाश...स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई..3 आरोपी जेरबंद..लाखोंचा मुद्देमाल जप्त
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि.३०):- जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कर्जत शहरामध्ये अवैध गुटखा बाळगून विक्री करणाऱ्या तिघांविरुद्ध कारवाई करून 3,00,566/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, पोलीस अंमलदार रमेश गांगर्डे, ऱ्हदय घोडके,फुरकान शेख, शामसुदंर जाधव,प्रकाश मांडगे, मनोज साखरे,भाऊसाहेब काळे, अमोल आजबे,अरुण मोरे यांचे पथक तयार करण्यात आले होते.या पथकाला जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती काढून त्वरित कारवाई करण्याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या.दि.29 सप्टेंबर 2025 रोजी कर्जत पोलीस ठाणे हद्दीत गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून भांडेवाडी परिसरातील सचिन सोपान झगडे हा आपल्या राहत्या घरी महाराष्ट्र राज्यात बंदी असलेला गुटखा व पानमसाला विक्री करत असल्याचे कळाले.यानुसार पथकाने कारवाई करून झडती घेतली असता, सचिन सोपान झगडे (वय 42, रा.भांडेवाडी, ता.कर्जत,जि.अहिल्यानगर) व त्याच्यासोबत स्वप्निल बबन सोनवणे (वय 23, रा. लोणी मसदपूर, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) असे दोघे आढळून आले.झडती दरम्यान त्यांच्या ताब्यातून 2,68,566/- रुपये किमतीचा आर.एम.डी. पानमसाला गुटखा, हिरा पान मसाला गुटखा,विमल पानमसाला गुटखा,डायरेक्टर स्पेशल पानमसाला गुटखा, सुगंधी तंबाखू तसेच 32,000/- रुपये किमतीची होंडा कंपनीची ड्रिम युगा मोटारसायकल असा एकूण 3,00,566/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.चौकशीत आरोपींनी सदर गुटखा हा भाऊसाहेब किसन सकुंडे (रा. मदनवाडी, भिगवन, ता. इंदापूर, जि. पुणे – सध्या फरार) याच्याकडून आणल्याची कबुली दिली आहे.ताब्यातील आरोपींना मुद्देमालासह कर्जत पोलीस ठाण्यात आणून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार भाऊसाहेब राजु काळे यांच्या फिर्यादीवरून गु.र.नं. 536/2025 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्हा भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 123, 223, 274, 275 सह अन्न सुरक्षा मानके अधिनियम 2006 व 2011 चे कलम 26 (2)(प), 26(2)(पअ), 27 (3)(डी), 27 (3)(ई), 59 (प) अंतर्गत नोंदविण्यात आला असून पुढील तपास कर्जत पोलीस स्टेशन करीत आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
No comments