शिक्षक समाजाचा आरसा -सुभाष जाधव वसंतनगर आश्रम शाळेत शिक्षक दिनी रंगला सन्मान सोहळा पारोळा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) शि...
शिक्षक समाजाचा आरसा -सुभाष जाधव
वसंतनगर आश्रम शाळेत शिक्षक दिनी रंगला सन्मान सोहळा
पारोळा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
शिक्षकच समाजाचा आरसा आहे. शिक्षकांनी समाज घडवीण्याचे कार्य केले असून जीवनात संस्कार, परोपकार यांची खाण आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्या गुरुजनाकडून मिळते. यासाठी आजचा दिवस त्यांचा सन्मानाचा असून आपण तो केलाच पाहिजे. असे प्रतिपादन वसंतराव नाईक ग्राम विकास मंडळाचे अद्यक्ष सुभाष जाधव यांनी वसंतनगर ता. पारोळा येथील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रम शाळेत शिक्षक दिनी 'शिक्षक सन्मान' सोहळ्यात प्रतिपादन केले.
यावेळी गजमल जाधव, बछराज जाधव, अशोक जाधव, मुख्याध्यापिका श्रीमती एल. एस. पाटील, सेवानिवृत्त मुख्याध्यापक सोपान पाटील, जेष्ठ शिक्षक एस. जे. भामरे, बी. पी. पाटील, एम. डी. सूर्यवंशी, डी. एस. पाटील, के. आर. पाटील, आर. सी. चौधरी, डी. एम. बडगुजर यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेचे अध्यक्ष सुभाष जाधव यांनी याप्रसंगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रम शाळेतील सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मान केला. या सन्मान सोहळ्याने सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी भारावले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. हिरालाल पाटील यांनी तर आभार एस. जे. भामरे यांनी केले.

No comments