adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सौ.सुषमा सबनीस - लवंद यांचे इंग्रजी विषयात सेट परीक्षेत घवघवीत यश.

 सौ.सुषमा सबनीस - लवंद यांचे इंग्रजी विषयात सेट परीक्षेत घवघवीत यश.  लातूर, जि. प्र.(उत्तम माने) (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मौजे कासारसिरस...

 सौ.सुषमा सबनीस - लवंद यांचे इंग्रजी विषयात सेट परीक्षेत घवघवीत यश. 

लातूर, जि. प्र.(उत्तम माने)

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)



मौजे कासारसिरसी ता. निलंगा जिल्हा लातूर येथील ग्रामीण भागात वास्तव्यास असलेल्या व आपले  प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण करत स्वतःचा प्रपंच सांभाळत ज्ञानार्जनासह ज्ञानदानाचे महान कार्य करत या रणरागिनीने 15 जून 2025 मध्ये घेण्यात आलेल्या सेट परीक्षेत इंग्रजी विषयात घवघवीत यश संपादन केले. तिच्या या यशाबाबत येथील सर्व शैक्षणिक संस्थेतून अभिनंदन करण्यात येत आहे. भूतपूर्व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सर्वश्री श्रीपाल जी सबनीस यांच्या सुनबाई असलेल्या सौ. सुषमा वैभव सबनीस स्वतःच्या घराण्यातील साहित्य परंपरा जपत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथून डॉक्टर पदवी प्राप्त केली असून आत्तापर्यंत त्यांची अनेक शोधनिबंध आंतरराष्ट्रीय पातळी वर प्रकाशित झाले आहेत. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात आणि परिषदेमध्ये त्यांनी आपले शोधनिबंध सादर केले आहेत त्यांच्या या शैक्षणिक उपक्रमाचे कासारसिरसी स्तरातून सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे..

No comments