adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

धनुर्विद्या आंतर महाविद्यालयीन स्पर्धेचे धनाजी नाना महाविद्यालयात यशस्वी आयोजन

  धनुर्विद्या आंतर महाविद्यालयीन स्पर्धेचे धनाजी नाना महाविद्यालयात यशस्वी आयोजन   इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजपूर ये...

 धनुर्विद्या आंतर महाविद्यालयीन स्पर्धेचे धनाजी नाना महाविद्यालयात यशस्वी आयोजन  


इदू पिंजारी फैजपूर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत जळगाव विभागातील धनुर्विद्या आंतर महाविद्यालयीन स्पर्धा २०२५ चे यशस्वी आयोजन करण्यात आले. धनुर्विद्या स्पर्धेत पुरुष आणि महिला गटात इंडियन राऊंड, रिकर्व्ह राऊंड व कंपाऊंड राऊंड स्पर्धा या तीन प्रकारात ह्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास अध्यक्ष म्हणून तापी परिसर विद्यामंडळ संस्थेचे उपाध्यक्ष मा. प्रा. डाॅ. एस. के. चौधरीसर, तर उदघाटक म्हणून संस्थेचे चेअरमन मा. श्री. लिलाधर विश्वनाथ चौधरी साहेब आणि प्रमुख पाहूने म्हणून संस्थेचे व्हाईस चेअरमन मा. श्री. के. आर. चौधरीसर, मा. श्री. मा. प्राचार्य डाॅ. एस. एस. पाटीलसर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे सर, पाल महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. लभाने सर हे उपस्थितीत होते.  सदरील स्पर्धे साठी सर्व संचालक मंडळातील सदस्यांनी शुभेच्छा दिल्या. प्रमुख उपस्थितीत महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. हरीश नेमाडेसर, जीमखाना समिती चेअरमन प्रा. डाॅ. ए. के. पाटील सर, जळगाव विभागाचे सचिव प्रा. सुभाष वानखेडे प्रा. डॉ. गोविंद सदाशिवराव मारतळे, प्रा. डाॅ. मुकेश पवार, प्रा. डॉ. महेश पाटील, प्रा. डाॅ. उमेश पाटील, प्रा. माधुरी नारखेडे मॅडम आदि उपस्थित होते. 

सदरील स्पर्धेत जळगाव  विभागातील चार पुरुष व चार महिला संघानी सहभाग नोंदविला.

स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे चेअरमन मा. श्री. लिलाधर विश्वनाथ चौधरी साहेब यांनी मनुष्य जीवनात सर्वात मौल्यवान शरीर आहे. मौल्यवान  शरीराला प्राप्त  करण्यासाठी खेळ एक उत्तम साधन व माध्यम आहे. खेळाच्या माध्यमातून शारीरिक, मानसिक व सामाजिक  विकास साधता येतो त्या करीता  सर्वानी खेळात सहभागी होण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री. डाॅ. एस. के. चौधरीसर यांनी सर्व खेळाडूना शुभेच्छा देऊन हार विजयाची परवा न करता खेळाचा आनंद घेत सातत्याने सराव करा असे सुचविले. या सोबतच सर्वांनीच खेळाकडे एक करिअर म्हणून पाहिले पाहिजे व त्या उद्देशानेच खेळाचा नियमीत सराव करून आपले,  राज्याचे व देशाचे नाव लौकिक करावे असे सांगितले आणि सर्व खेळाडूंनी सहभाग घेतल्या बदल अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. धनुर्विद्या पुरूष गटात धनाजी नाना महाविद्यालय  फैजपूर- प्रथम, कला व विज्ञान महाविद्यालय, भालोद व्दितीय आणि कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पाल - तृतीय तसेच महिला गटात कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पाल प्रथम, धनाजी नाना महाविद्यालय  फैजपूर- द्वितीय, कला व विज्ञान महाविद्यालय, भालोद- तृतीय  विजयी झाले. विजय झालेले खेळाडू विभागीय स्पर्धेत धनाजी नाना महाविद्यालयात सहभागी होतील.

स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी जळगाव जिल्हा धनुर्विद्या असोसिएशन चे पंच यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारीरिक शिक्षण संचालक डॉ. गोविंद सदाशिवराव मारतळे यांनी केले तर आभार प्रा. शिवाजी मगर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी प्रा. डॉ. ए. के. पाटील सर, प्रा. डाॅ. गोविंद मारतळे, प्रा. शिवाजी मगर आणि राजेंद्र ठाकुर यांनी परिश्रम घेतले.

No comments