adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

लासुर येथे संगितमय शिवपुराण कथा उत्साहात संपन्न

लासुर येथे संगितमय शिवपुराण कथा उत्साहात संपन्न    लासूर ता‌.चोपडा(प्रतिनिधी)  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) येथे दि ‌.13/9/2025 पासून संगितम...

लासुर येथे संगितमय शिवपुराण कथा उत्साहात संपन्न  


 लासूर ता‌.चोपडा(प्रतिनिधी) 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

येथे दि ‌.13/9/2025 पासून संगितमय शिवपुराण कथा ह‌.भ‌.प‌.दिनेशजी महाराज कंचनपूरकर यांच्या अमृतवाणी तून दि‌.19/9/2025 पर्यंत उत्साहात संपन्न झाली कथेच्या शेवटचा दिवशी संपूर्ण गावातून वाजत गाजत शोभायात्रा काढण्यात आली यावेळी अश्वारूढ बग्गीद्वारे व भाविकांच्या उपस्थितीत संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली तसेच दि‌‌.20/9/2025 रोजी ह ‌भ‌.प‌.दिनेशजी महाराज कंचनपूरकर यांच्या अमृतवाणी तून काल्याचे कीर्तनाने संगितमय शिवपुराण कथेच्या समारोप करण्यात आला  या कथेत विठ्ठल भजनी मंडळ यांनी रोज सकाळी काकड आरती व संध्याकाळी हरीपाठ‌ व कथेला साथ संगत दिली. या निमित्ताने संपूर्ण गावासाठी महाप्रसादाचे आयोजन हि यावेळी करण्यात आले होते गावातील सर्व भाविक बंधू भगिनींनी तन मन धनाने शिवपुराण समितीस सहकार्य केले.या कार्यक्रमात लासूरचे सरपंच श्रीमती नर्मदा बाई भिल‌, उपसरपंच अनिल पाटील, चोपडा सुत गिरणी संचालक अमृतराव वाघ, क्षत्रिय माळी समाजाचे अध्यक्ष ए‌.के‌.गंभीर‌ सर  व गावातील सर्व संस्थांचे आजी माजी पदाधिकारी यांनी कथाकार ह‌.भ‌.प‌.दिनेशजी महाराज यांच्या सत्कार करण्यात आला तसेच समितीचे अध्यक्ष समाधान कोळी, उपाध्यक्ष छोटू वायरमन , सचिव सुरेश माळी, सहसचिव नंदू पाटील, तसेच समितीचे सदस्य रावसाहेब सोनगिरे,राहुल कोळी, सुरेश माळी,देवा मगरे, मुन्ना महाजन,नाना महाजन,बाळु महाजन, सुरेश पाटील,सोनू पाटील, रामकृष्ण पाटील, विशाल ठाकूर तसेच भजनी मंडळाचे पदाधिकारी यांच्या सत्कार करण्यात आला.कथेच्या समारोप निमित्ताने व महाप्रसाद आयोजन असल्याने गावातील सर्व मजूर, शेतकरी हे शेतात गेले नाही व संपूर्ण बाजारपेठ व गावातील सर्व दूकाने सुध्दा बंद करून शिवपुराण कथेत उपस्थित होते.संगितमय शिवपुराण कथेसाठी येथिल इंदिरा नगर भागातील ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली व त्यांना गावातील सर्व भाविक भक्तांनी सहकार्य केले सुत्र संचालन ह‌.भ‌.प‌.बापु चौधरी यांनी केले

No comments