इंस्टाग्रामवर धार्मिक भावना दुखावणाऱ्या विरुद्ध कारवाईची मागणी "सावदा पोलिस ठाण्यात तरुणांकडून निवेदन सादर" रावेर प्रतिनिधी मु...
इंस्टाग्रामवर धार्मिक भावना दुखावणाऱ्या विरुद्ध कारवाईची मागणी
"सावदा पोलिस ठाण्यात तरुणांकडून निवेदन सादर"
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
इस्लाम धर्माचे प्रथम व शेवटचे प्रेषक पैगंबर मोहम्मद सल्ललाहो अलैह वस्सल्लम नबी यांच्या बाबत आक्षेपार्ह शब्दात इंस्टाग्रामवर भागवती प्रसाद शुक्ला या गुंड्याने जाणीवपूर्वक धाष्टार्य(गुस्ताखी)करण्याचा प्रयत्न करून संपूर्ण मुस्लिम समाजाची धार्मिक भावना दुखावल्या,तरी सदर गंड्यांवर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी.याबाबत मोहसिन अब्दुल सत्तार,आदिल खान,शादाब खान,स्लमान खान,मुनसफ खान,जियाउद्दीन शेख,सिराज भाई सह महिला अन्याय अत्याचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्य चे पदाधिकारी फरीद शेख,युसूफ शाह,नविन सुन्नी मुस्लिम कब्रस्ताना कमिटीचे अध्यक्ष कलिम जनाब यांनी नुकतेच निवेदनाद्वारे सपोनि विशाल पाटील सावदा यांच्याकडे निवेदनाद्वारे कठोर कारवाई करण्यातची मागणी केली आहे.
तरी यावेळी सोशल मीडियावर असे चुकीचे संदेश वगैरे गोष्टी वायरल करणाऱ्यांचे सोशल(आयडी)बंद पाडण्यासाठी लोकांनी देखील मोबाईलच्या माध्यमातून रिपोर्ट करण्याचा सोपा मार्ग निवडला पाहिजे.असे मार्गदर्शन निवेदनकर्त्यांना त्यांनी केले.सबब तात्काळ या चुकीच्या गोष्टीं विरूध्द(रिपोर्ट करो)या नावाने सदरील निवेदनकर्त्यां तरुणांनी थेट मोबाईल वर एक चैनल तयार केले आहेत.

No comments