adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

खडसे महाविद्यालयात Future with AI" या विषयावर कार्यशाळा संपन्न

 खडसे महाविद्यालयात Future with AI" या विषयावर कार्यशाळा संपन्न  मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड (संपादक -:- हेमकांत गायकवाड)    मुक्...

 खडसे महाविद्यालयात Future with AI" या विषयावर कार्यशाळा संपन्न 


मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

   मुक्ताईनगर येथील श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालयात दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी द क्वेस्ट सेंटर, पुणे व संगणकशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने "Future with AI" या विषयावर टेक टॉकचे आयोजन  करण्यात आले.

       "Future with AI" या विषयावर एक विशेष Tech Talk चे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयाच्या TY BSc आणि BCA वर्गातील विद्यार्थ्यांनी AI (Artificial Intelligence) हे सध्या कुठे वापरले जाते आणि याचा भविष्यामध्ये कुठल्या क्षेत्रांमध्ये वापर होऊ शकतो यावरती सादरीकरण करण्यात आले . . सदर कार्यक्रमाचे आयोजन टी क्यू सी मध्ये सहभागी असणारे विद्यार्थी यांच्यामार्फत करण्यात आले.महाविद्यालयाच्या उपप्राचार्य वंदना चौधरी यांनी विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात झालेली वाढ तसेच संवाद कौशल्यता यात झालेली सुधारणा आणि भविष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक व्यापक झाला आहे असे आपल्या मनोगतात सांगितले. तरुण वर्गाने या आधुनिक टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये रोजगाराच्या दिशेने वाटचाल कर रोजगार मिळवावा असेही नमूद केले.

        महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच . ए.महाजन व उपप्राचार्य डॉ. संजीव साळवे यांनी भविष्यासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन योग्य दिशेने मार्गक्रमण करावे असे नमूद केले.

        सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी नेमाडे या विद्यार्थिनीने केले.     कार्यक्रमाप्रसंगी  कार्यक्रमासाठी संगणक शास्त्र विभाग प्रमुख सौ. सीमा राणे तसेच विभागातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. सदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. व्ही. व्ही. चौधरी,  डॉ. सीमा राणे (संगणकशास्त्र विभाग प्रमुख)प्रा. व्ही. पी. महाजन, प्रा. अभिषेक  पाटील, प्रा. प्रियंका खडसे तसेच संगणकशास्त्र विभागातील इतर शिक्षक उपस्थित होते.

No comments