adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

महसूल सेवक (कोतवाल) पदास शासकीय चतुर्थ श्रेणी दर्जा द्या - चोपडा महसूल सेवक संघटनेची मागणी

 महसूल सेवक (कोतवाल) पदास शासकीय चतुर्थ श्रेणी दर्जा द्या - चोपडा महसूल सेवक संघटनेची मागणी    चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) ...

 महसूल सेवक (कोतवाल) पदास शासकीय चतुर्थ श्रेणी दर्जा द्या - चोपडा महसूल सेवक संघटनेची मागणी   


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

महसूल सेवक (कोतवाल) पदास शासकीय चतुर्थ श्रेणी दर्जा देण्याबाबत दि. 11/09/2025 रोजी चोपडा महसूल सेवक संघटना यांनी तहसीलदार श्री. भाऊसाहेब थोरात यांना निवेदन दिले. 

   सदर निवेदनात महसूल सेवक हा महसूल विभागाचा कणा असुन शासनाच्या विविध योजना गावपातळीवर राबविण्याचे काम कोतवाल करत असतो. ब्रिटिशकालीन हे पद असुन आजही न्यायापासून उपेक्षित आहे. महसूल सेवक (कोतवाल) हा तहसील कार्यालयामध्ये मध्ये रात्रपहारेकरी, वाळू पथक, निवडणूक, पुरवठा विभागात, कार्यालयीन टपाल वाटप, वाहन चालक, पीकपेरा लावणे, तसेच कार्यालयीन विविध कामांमध्ये लिपिक प्रवर्गाच्या खांद्याला खांदा लावून महसूल सेवक हा कामात अग्रेसर असतो आणि सदर पदास मानधनी ठेऊन शासन अन्याय करत आहे. विदर्भ कोतवाल संघटना व महाराष्ट्र महसूल सेवक संघटना उद्यापासून नागपूर (कोराडी) महसूल मंत्री यांच्या क्षेत्रात बेमुदत धरणे आंदोलन व साखळी उपोषणस बसत आहेत तरी शासनाने महसूल सेवक यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करून महसूल सेवक यांना न्याय द्यावा अशी मागणी चोपडा महसूल संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

सदर निवेदनावर चोपडा महसूल सेवक संघटना अध्यक्ष श्री. जितेंद्र पुंडलिक चौधरी, उपाध्यक्ष श्री. विनोद गंगाराम भालेराव, महिला उपाध्यक्ष सौं. सिमा सतिष करनकाळे, सचिव श्री. सुरेश विनायक बाविस्कर, मार्गदर्शक श्री. अमीन पिंजारी तसेच तालुक्यातील सर्व महसूल सेवक यांच्या सह्या आहेत.

No comments