adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सरदार वल्लभ भाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल यावल मधील विद्यार्थ्याने शालेय नाशिक विभागीय बॉक्सिंग स्पर्धेतपटकविले रौप्य पदक

 सरदार वल्लभ भाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल यावल मधील विद्यार्थ्याने शालेय नाशिक विभागीय बॉक्सिंग स्पर्धेतपटकविले रौप्य पदक.  भरत कोळी यावल त...

 सरदार वल्लभ भाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल यावल मधील विद्यार्थ्याने शालेय नाशिक विभागीय बॉक्सिंग स्पर्धेतपटकविले रौप्य पदक. 


भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल . दिनांक 18 सप्टेंबर रोजी शालेय नाशिक विभागीय बॉक्सिंग स्पर्धा 2025 -26 बॉक्सिंग स्पर्धा कै. दादासाहेब विश्वासराव जी रंधे क्रीडा संकुल, शिरपूर येथे आयोजित करण्यात आली होती .यात सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल मधील इ ७ वी चा विद्यार्थी भुषण रविंद्र भालेराव या  विद्यार्थ्याची निवड झाली होती. यात भूषण भालेराव या विद्यार्थ्याला द्वितीय क्रमांक  मिळवत रौप्य पदक पटकाविले आहे . तर भुषण भालेराव या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. यात विद्यार्थ्याचे  कठोर परिश्रम, चिकाटी व क्रीडा शिक्षक सय्यद इरतेकाज सर यांचे मार्गदर्शन होते. या  विजेत्या विद्याथ्याचे शाळेचे अध्यक्ष डॉ श्री प्रदीप माहेश्वरी सर व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शिला तायडे मॅडम यांनी विद्यार्थ्याचे स्वागत व कौतुक केले व क्रीडा शिक्षक सय्यद इरतेकाज सर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले .

No comments