आदिवासींच्या नेत्या प्रतिभाताई शिंदे यांचा उज्जैनकर फाउंडेशन तर्फे सत्कार इदू पिंजारी प्रतिनिधी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) शिवचरण...
आदिवासींच्या नेत्या प्रतिभाताई शिंदे यांचा उज्जैनकर फाउंडेशन तर्फे सत्कार
इदू पिंजारी प्रतिनिधी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.शिवचरण उज्जैनकर यांनी नुकतीच लोक संघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मा. प्रतिमाताई शिंदे यांची जळगाव येथे त्यांचे निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली याप्रसंगी डॉ. उज्जैनकर यांनी मा.प्रतिमाताई शिंदे यांचा गुलाब बुके देऊन सत्कार केला प्रतिमाताई शिंदे या अनेक वर्षापासून आदिवासी बंधू भगिनींच्या ज्वलंत प्रश्नांकडे व त्यांच्या न्याय हक्कांसाठी शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी विविध मोर्चे आंदोलने करीत आहेत आदिवासींच्या नेत्या म्हणून त्यांचे नावलौकिक आहे डॉ. उज्जैनकर यांनी अनेक वेळा प्रतिभाताई यांची भेट घेऊन विविध सामाजिक कार्याविषयी चर्चा केलेली आहे प्रसंगी ताईंनी उज्जैनकर फाउंडेशनच्या अखंड यशस्वी कार्याबद्दल चर्चा करून अभिनंदन केले डॉ.उज्जैनकर हे गेल्या 27 वर्षापासून नवीन माध्यमिक विद्यालय, पारंबी तालुका मुक्ताईनगर येथे शिक्षक म्हणून कार्य करत आहे तरी देखील नोकरी सांभाळून त्यांनी गेल्या 25 वर्षापासून शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक ,कला ,आरोग्य अशा विविध क्षेत्रांमध्ये नेत्र दीपक कार्य करीत आहे याविषयी प्रतिमाताई शिंदे यांनी डॉ. शिवचरण उज्जैनकर यांचे मनापासून अभिनंदन व कौतुक केले.

No comments