adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

“वैद्यकीय तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष ओळख – कोलते हॉस्पिटलमध्ये नूतन विद्यालय दहावीच्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक उपक्रम”

  “वैद्यकीय तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष ओळख – कोलते हॉस्पिटलमध्ये नूतन विद्यालय दहावीच्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक उपक्रम” अमोल बावस्कार बुलढाणा...

  “वैद्यकीय तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष ओळख – कोलते हॉस्पिटलमध्ये नूतन विद्यालय दहावीच्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक उपक्रम”


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मलकापूर (चाळीस बिघा) – कोलते हॉस्पिटलमध्ये नूतन विद्यालय व विज्ञान महाविद्यालय, मलकापूर येथील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रख्यात लेप्रोस्कोपिक सर्जन डॉ. गौरव कोलते व स्त्रीरोग तज्ञ डॉ. स्नेहा कोलते यांनी विद्यार्थ्यांना मानवी अवयव व त्यांच्यावर होणाऱ्या विविध शस्त्रक्रियांची सविस्तर माहिती दिली.

यावेळी विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शस्त्रक्रिया पद्धती व वैद्यकीय क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाधारित यंत्रांची प्रत्यक्ष ओळख करून देण्यात आली. विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना डॉ. गौरव कोलते यांनी त्यांच्या वैद्यकीय कुतूहलाचे कौतुक केले. या शैक्षणिक उपक्रमाचे नियोजन व रूपरेषा श्री. सचिन पाटील सर यांनी केली. उपक्रमामागचा उद्देश विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबतच प्रत्यक्ष तांत्रिक व वैद्यकीय ज्ञान मिळावे हा होता.

No comments