धनाजी नाना महाविद्यालयात पदव्युत्तर व संशोधक विद्यार्थ्यांसाठी संशोधन पद्धती या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन इदू पिंजारी फैजपूर (...
धनाजी नाना महाविद्यालयात पदव्युत्तर व संशोधक विद्यार्थ्यांसाठी संशोधन पद्धती या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात इंटरनल क्वालिटी अँशुरन्स सेल व संशोधन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ स्तरीय एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र वाघुळदे असतील तर
या कार्यशाळेसाठी उद्घाटक म्हणून प्रा डॉ विकास गीते, विभाग प्रमुख पॉलिमर केमिस्ट्री, विभाग कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांची उपस्थिती राहणार असून ते संशोधन प्रबंध लेखनाची तंत्रे या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत या सहित साधन व्यक्ती म्हणून प्राचार्य डॉ अरविंद चौधरी, बोदवड यांचे संशोधन साहित्य पुनरावलोकन व प्रा डॉ अनिल बारी यांचे संशोधन आराखडा व मापदंड या विषयांवर मार्गदर्शन होणार आहे.
उच्च शिक्षणात अध्ययन, अध्यापनासहितच संशोधन यालाही अनन्य महत्व आहे. संशोधनातूनच समाज व देशाची प्रगती होत असून दर्जेदार संशोधन निर्मिती साठी व महाविद्यालयातील पदव्युत्तर व संशोधक विद्यार्थ्यांसाठी संशोधन विषयातील बारकावे अधोरेखित करण्यासाठी सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याचे मत इंटरनल क्वालिटी अँशुरन्स सेल समन्वयक उपप्राचार्य डॉ हरीश नेमाडे यांनी केले. सदर कार्यशाळा नाविन्यपूर्ण तितकीच महत्त्वपूर्ण असल्याने या संधीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ राजेंद्र वाघुळदे यांनी केले. कार्यशाळेच्या आयोजनासाठी तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष श्री शिरीषदादा चौधरी, सर्व सन्माननीय पदाधिकारी यांचे मार्गदर्शन लाभत असून महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी परिश्रम घेत आहेत.

No comments