adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शिक्षक नेते शालिग्राम भिरुड सर आज सेवानिवृत्त

 शिक्षक नेते शालिग्राम भिरुड सर आज सेवानिवृत्त   इदू पिंजारी फैजपूर -  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जळगाव येथील कै सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ...

 शिक्षक नेते शालिग्राम भिरुड सर आज सेवानिवृत्त 


 इदू पिंजारी फैजपूर - 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

जळगाव येथील कै सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूल चे कलाशिक्षक आज ३८ वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत. सेवा काळात शैक्षणिक, सामाजिक व सहकार क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. विविध शिक्षक संघटनांची जिल्हा, राज्य व देशपातळीवर पदे ते भुषवित आहे.जिल्हास्तरीय कृतीसत्रे, तीन राज्यस्तरीय अधिवेशने, एक राष्ट्रीय स्तरावरील अधिवेशनाचे संयोजक म्हणून त्यांनी यशस्वीपणे जबाबदारी पार पाडली आहे. संघटनेच्या माध्यमातून सार्क टीचर फेडरेशनने कोलंबो ( श्रीलंका)  येथे तसेच एशिया पॅसिफिक रिजनच्या कोललंमपूर (मलेशिया) येथे झालेल्या जागतिक परिषदेत ते सहभागी झाले होते. शिक्षकांच्या विविध मागण्यांचा त्यांनी सेवा काळात सतत पाठपुरावा केला.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणेचे अभ्यास मंडळ सदस्य, शासकीय रेखाकला परीक्षा पुन्ररचित अभ्यास मंडळ सदस्य म्हणून त्यांनी काम केले. शासकीय रेखाकला परीक्षांमध्ये गुणवत्ता यादीत त्यांचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या माध्यमातून सभासदांसाठी त्यांनी विविध योजना राबविल्या. त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली पतपेढीने रिंग रोड परिसरात नवीन भव्य इमारत उभारुन ग्रंथालय, अभ्यासिका, योगा असे उपक्रम त्याठिकाणी राबविण्यात येत आहेत. पतपेढीच्या संस्थापक अध्यक्षांनंतर ते सर्वाधिक काळ म्हणजे १० वर्षे त्यांनी अध्यक्ष पद भूषविले आहे.

No comments