adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

प्रधानमंत्री फसल पिक विमा योजना जुनी लागू करावी शेतकरी संघटना पारोळा तर्फे कृषी विभागाला निवेदन

  प्रधानमंत्री फसल पिक विमा योजना जुनी लागू करावी  शेतकरी संघटना पारोळा तर्फे कृषी विभागाला निवेदन             विकास पाटील धरणगाव (संपादक -:...

 प्रधानमंत्री फसल पिक विमा योजना जुनी लागू करावी 

शेतकरी संघटना पारोळा तर्फे कृषी विभागाला निवेदन            


विकास पाटील धरणगाव

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

पारोळा: भारत देशात शेतकऱ्यांसाठी सुरू असलेली प्रधान मंत्री फसल पीक योजना ही शेतकरी वर्गासाठी मारक  असून. यात कंपन्यांचाच निवड नफा व फायदा झालेला दिसून येत आहे. व दिसून आल्याचे स्पष्ट झालेले आहे. 

         अतिवृष्टी व परतीच्या पावसाने अवकाळी पावसाने या वर्षी सुद्धा जळगाव जिल्ह्यासह पारोळा एरंडोल पाचोरा चाळीसगाव भडगाव इतर तालुक्यात शेतकऱ्यांच्या पिकांना सर्वाधिक फटका बसलेला असून शेतकरी हात बल व निराश झाल्याचे दिसून येत आहे, यात शेतकऱ्यांना वेगवेगळे निकष मध्ये बांधून शेतकऱ्यांना मुठीत बांधण्याचे काम दिसत आहे. या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च सुद्धा निघणार नसल्याने शेतकरी वर्ग भयभीत झालेला आहे त्यासाठी कोणत्याही अटी व कोणतेही निकष न लावता उत्पादन खर्चासहित शेतकऱ्यांना अनुदान द्यावे अशी मागणी महाराष्ट्रातून होताना दिसत आहे. 

           सततचा पाऊस शासनाच्या धोरणानुसार नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करण्याचे नियम असून, याकडे डोळे झाक करून . वेगवेगळ्या निकषात शेतकऱ्यांना अडकून ठेवलेले दिसत आहे, अशा अटी व शर्ती, बंद करून मागील वर्षाच्या पिक विमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना द्यावा अशी मागणी स्व, शरद जोशी प्रणित शेतकरी संघटने कडून केली आहे, 

                 प्रधानमंत्री फसल पीक योजना कोणत्याही खाजगी कंपनींना न देता सरळ सरळ याचा फायदा शेतकऱ्यांना कसा होईल याकडे शासनाने लक्ष घालावे. कारण यापूर्वी खाजगी कंपन्यांना जवळजवळ ८७ हजार कोटी कोटीचा नफा कमविला निदर्शनास आले असून त्यात शेतकऱ्यांना फटका बसल्याचे दिसत आहे, अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा दिसत आहे यात केंद्र सरकारचा हिस्सा, राज्य सरकारचा हिस्सा, व शेतकऱ्यांचा हिस्सा, हे प्रीमियम चे पैसे कंपन्यांना देणे ऐवजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे, तरच शेतकऱ्यांसाठी विमा योजना फायदेशीर ठरेल प्रधानमंत्री फसल पीक योजना या योजनेचे यावर्षी पूर्णतः स्वरूप  संपूर्ण ट्रिगर . बदल केल्याने शेतकऱ्यांना इंटिमेशन देता येत नसल्याने अशा जुलमी अटी शर्ती, टाकून पिक विमा हा पिककापणी प्रयोगावर आधारित, उंबरठा उत्पन्नावर आधारित ही प्रधानमंत्री फसल पिक विमा योजना शेतकऱ्यांच्या फायदेशीर नसल्याने नवीन निकष टाकल्याने शेतकऱ्यांना नुकसानकारक आहे त्यासाठी जुनीच पिक विमा योजना राबवण्यात यावी व त्याचा लाभ सरळ सरळ शेतकऱ्यांना देण्यात यावा, अशी मागणी स्व शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना जळगाव पारोळाच्या वतीने कृषी विभाग पारोळा यांना निवेदनासह करण्यात आली आहे 

  यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष किशोर पाटील शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रा, भिकनराव पाटील छावा चे विजय पाटील दीपक पाटील दत्तू पाटील आत्माराम पाटील नितीन पाटील रवींद्र पाटील धनराज पाटील अनिल पाटील जगन्नाथ चौधरी राहुल पाटील मनोहर जाधव विठ्ठल पाटील इत्यादी तालुका तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाचे उप कृषी अधिकारी सौ शितल पाटील सहाय्यक कृषी अधिकारी, ज्ञानेश्वर जाधव, व सहाय्यक कृषी अधिकारी भामरे यांना निवेदन दिले

No comments