फैजपूरमध्ये माँ आयशा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या कामाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले निरीक्षण कामाच्या गतीचे कौतुक इदू पिंजारी फैजपूर...
फैजपूरमध्ये माँ आयशा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या कामाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले निरीक्षण कामाच्या गतीचे कौतुक
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर शहरातील बांधकाम सुरू असलेल्या माँ आयशा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला आमदार चंद्रकांत पाटील यांनी भेट देऊन कामाची पाहणी केली. या वेळी त्यांनी वेगाने सुरू असलेल्या कामाचे समाधान व्यक्त केले तसेच अल खि़जर सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. या निरीक्षणावेळी मुक्ताईनगरचे भावी नगरसेवक अफसर खान, सावदा शहराचे नगरसेवक फिरोज खान, हकीम आर. चौधरी व समाजसेवक तौकीर अहमद यांची उपस्थिती होती.
आमदार पाटील म्हणाले हा रुग्णालय प्रकल्प फैजपूरपुरता मर्यादित राहणार नाही, तर संपूर्ण परिसरासाठी वरदान ठरेल. सर्वसामान्य नागरिकांना आधुनिक आरोग्य सेवा सहज उपलब्ध होतील.
स्थानिक नागरिकांनीही या प्रकल्पाबद्दल आनंद व्यक्त केला आणि येणाऱ्या काळात या रुग्णालयामुळे परिसराच्या आरोग्य सेवांना नवे बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. अल खि़जर सोसायटीचे पदाधिकारी अध्यक्ष डॉ.दानिश उपाध्यक्ष मुझम्मिल काझी सचिव एजाज सर सहसचिव रफीक जनाब खजिनदार अल्ताफ खान, सदस्य अख्तर जनाब, अयाज सर, शेख वसीम, शेख शोएब आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments