“बहुजन चळवळ तरुणांच्या खांद्यावरच उभी राहणार” – सुजात आंबेडकर उद्या सावद्यात रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) डॉ...
“बहुजन चळवळ तरुणांच्या खांद्यावरच उभी राहणार” – सुजात आंबेडकर उद्या सावद्यात
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू सुजात आंबेडकर उद्या (२१ सप्टेंबर) सावदा शहरात होणाऱ्या युवा संवाद मेळाव्यात तरुणांना थेट हाक देणार आहेत. “जर तरुणाई जागी झाली नाही, तर बहुजन चळवळ कधीच पुढे जाणार नाही” असा थेट संदेश ते युवकांना देणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
सुजात आंबेडकर बहुजन तरुणांना संघटित होण्याचे आवाहन करणार असून, शिक्षण, संघटन आणि संघर्ष या तत्त्वांवर आधारलेली आंबेडकरी विचारधारा समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारीही युवकांनी स्वीकारली पाहिजे.
जातिव्यवस्थेचा पगडा, अंधश्रद्धा आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्यासाठी तरुणाईने संघर्षाची मशाल हाती घ्यावी, अन्यथा चळवळ कमकुवत होईल या संदर्भात ते थेट युवकांशी संवाद साधणार आहेत. सावदा शहरासह परिसरातील युवक-युवतींमध्ये या मेळाव्याबद्दल प्रचंड उत्सुकता असून, मोठ्या संख्येने उपस्थितीची तयारी सुरू आहे.

No comments