adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सार्वजनिक विद्यालय अडावद येथे विद्यार्थ्यांनी दिला वृक्षारोपणाचा संदेश : वृक्षदिंडित ग्रामपंचायत प्रशासनाचा सहभाग

 सार्वजनिक विद्यालय अडावद येथे विद्यार्थ्यांनी दिला वृक्षारोपणाचा संदेश : वृक्षदिंडित ग्रामपंचायत प्रशासनाचा सहभाग   अडावद ता चोपडा येथील सा...

 सार्वजनिक विद्यालय अडावद येथे विद्यार्थ्यांनी दिला वृक्षारोपणाचा संदेश : वृक्षदिंडित ग्रामपंचायत प्रशासनाचा सहभाग 


अडावद ता चोपडा येथील सार्वजनिक विद्यालयात वृक्षदिडी रॅली प्रसंगी सरपंच बबनखा तडवी ग्राम विकास अधिकारी प्रमोद सैंदाणे मुख्याध्यापक अशोक कदम के एन साळुके सर्व शिक्षक व शिक्षिका व विद्यार्थी

अडावद ता. चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

    येथे  ’मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ अंतर्गत ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांनी रॅली  काढली. याद्वारे विद्यार्थ्यांनी वृक्षारोणाचा संदेश घरोघरीपोहोचवला. 

      १७ रोजी सकाळी १० वाजता सार्वजनिक  विद्यालय  व सार्वजनिक खाजगी प्राथमिक शाळा       यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षदिंडी काढली. महाराष्ट्र शासनच्या ग्रामविकास विकास व पंचायत राज विभाग जिल्हा परिषद, जळगाव ’मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ याचा शुभारंभ ग्रामपंचायत अडावद तर्फे करण्यात आला.   या अभियानाचा कालावधी १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २५ पर्यंत  आहे यात विद्यार्थ्यांनी काढलेल्या रॅलीत ’प्रत्येकाचा एक संकल्प दरवर्षी एक वृक्ष..!’, ’ आज लावलेले झाड उद्या जीवनाचा आधार...!’ व या शासन अभियानाचा शुभारंभ १७ रोजी रोजी वृक्ष लागवड करुन करुया...। अशा घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्यात. या रॅलीत   सरपंच बबनखा तडवी   ग्राम विकास अधिकारी     प्रमोद सैदाणे  मुख्याध्यापक   ए जे कदम, के एन  सांळुके   व   शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते  या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी    शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. 

No comments