फैजपूरच्या मौलाना आझाद हायस्कूल रस्त्याची गैरसोय विद्यार्थी-विद्यार्थिनींचा तिव्र संताप इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फै...
फैजपूरच्या मौलाना आझाद हायस्कूल रस्त्याची गैरसोय विद्यार्थी-विद्यार्थिनींचा तिव्र संताप
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर येथील मौलाना आझाद हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे मोठया प्रमाणात अत्यंत रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून जागोजागी डपके साचून चिखलमय झाले आहे. फैजपूर कळमोदा रस्ता पोलीस स्टेशन ते मौलाना आझाद हायस्कूल पर्यंतचा रस्ता दयनीय झाला असुन या शाळेत दररोज १५०० विद्यार्थी विद्यार्थिनी ये जा करत असतात रस्ता खराब असल्याकारणाने दररोज लहान मोठे अपघाताचे घटना घडत आहे रस्त्याच्या साईडने पाण्याचे नियोजन करून दोन्ही बाजूने मुरूम टाकून भराव टाकण्यात यावे. या रस्त्याने शिक्षक शिक्षीका नागरीक शेतकरी यांचा सुद्धा रहदारीचा मार्ग आहे. तरी समस्या तात्काळ सोडविण्यात यावी अशी तक्रार नगरपालिका तसेच बांधकाम विभाग यावल यांच्याकडे मौलाना आझाद हायस्कूल ने लेखी स्वरूपात केली आहे.

No comments