घोडगावच्या सी. बी. निकुंभ हायस्कुल व एस. एन. आर. जी इंग्लिश मेडीयम स्कुल यांची आय. आय. टी. मद्रास सोबत शैक्षणिक भागीदारी जळगाव जिल्ह्यातील ...
घोडगावच्या सी. बी. निकुंभ हायस्कुल व एस. एन. आर. जी इंग्लिश मेडीयम स्कुल यांची आय. आय. टी. मद्रास सोबत शैक्षणिक भागीदारी
जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळा म्हणून बहुमान
गलंगी ता.चोपडा मच्छिंद्र कोळी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा तालुक्यातील घोडगांव येथील नूतन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सी. बी. निकुंभ माध्य. व उच्च माध्य. विद्यालय व एस. एन. आर. जी इंग्लिश मेडीयम स्कुल यांची भारतातील अत्यंत प्रतिष्ठित अश्या चेन्नई येथील आय आय टी मद्रास या शैक्षणिक संस्थेशी (विद्यापीठ) शैक्षणिक भागीदारी करण्याचा बहुमन मिळाला आहे. आय आय टी मद्रास ही भारतातल्या तंत्रशिक्षण क्षेत्रातील प्रमुख आठ शिक्षणसंस्थांपैकी एक असून या संस्थेशी घोडगांव येथील सी. बी. निकुंभ विदयालय व एस. एन. आर. जी. इंग्लिश मेडीयम स्कुल या शाळा शैक्षणिक भागीदारी करणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पहिल्या शाळा ठरल्या आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान, एआय वर आधारित विविध कोर्सेस करण्याची संधी मिळणार आहे. याआधारे कौशल्यपूर्ण शिक्षणाची संधी घोडगांव परिसरातील विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष चंद्रहासभाई गुजराथी,उपाध्यक्ष द्रविलाल पाटील, सचिव जवरीलाल जैन,सहसचिव भानुदास पाटील,विधी सल्लागार डॉ. सुरेश पाटील,रमाकांत सोनार,रामकृष्ण पाटील,मदन पाटील,निंबा पाटील, कांतीलाल पाटील, सी. बी. निकुंभ विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. एम. चौधरी, पर्यवेक्षक व्ही. पी. पाटील व एस. एन. आर. जी. इंग्लिश मेडीयम स्कुलच्या प्राचार्या जेनीफर साळुंके व सर्व विभागाचे शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

No comments