adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

दहिगावातील आदर्श विद्यालयात तुकोबारायांचा अभंग सांगताना निवृत्त शिक्षकाचे थांबले हृदय एम. डी. नारखेडे सर यांचे सत्काराचा समारंभात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

 दहिगावातील आदर्श विद्यालयात तुकोबारायांचा अभंग सांगताना निवृत्त शिक्षकाचे थांबले हृदय एम. डी. नारखेडे सर यांचे सत्काराचा समारंभात हृदयविकार...

 दहिगावातील आदर्श विद्यालयात तुकोबारायांचा अभंग सांगताना निवृत्त शिक्षकाचे थांबले हृदय

एम. डी. नारखेडे सर यांचे सत्काराचा समारंभात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने  निधन  


भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 न्हावी येथील मूळ रहिवासी आणि  फैजपूर येथे वास्तव्यास असलेले एम. डी. नारखेडे सर  माजी मुख्यध्यापक  आदर्श विद्यालय दहीगाव, संचालक- जनता एज्युकेशन सोसायटी दहीगाव शैक्षणिक क्षेत्रात भरीव मदत करीत असायचे यांचा दि. १ सप्टेंबर रोजी दहिगाव येथे  सत्काराचा समारंभ कार्यक्रम सुरू असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने  निधन झाले.

      शाळेतील हुशार विद्यार्थ्यांना  दरवर्षी बक्षिस म्हणून त्यांच्यातर्फे काही रक्कम रोख स्वरूपात देता यावी म्हणून त्यांनी ३३ वर्षे सेवा दिलेल्या शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांसाठी २ लाख रुपयांची मुदत ठेव देण्याचा प्रस्ताव मांडला. आणि दोन लाख रुपयांचा चेक शाळेत दिला.यानंतरच्या छोटेखानी बैठकीत ते शिक्षकांसोबत संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील कर्म, धर्म, प्रारब्ध यावर बोलत होते. शिक्षकांना तुकाराम महाराजांचा सहा ओळींचा अभंग नारखेडे सांगत होते. पैकी 'साळंकृत कन्यादान पृथ्वी दानाच्या समान ।।१।। परि ते न कळे या मूढा। येईल कळों भोग पुढां ।। ।। आचरतां कर्म। भरे पोट राहे धर्म ।। २ ।।' या दोन ओळी सांगून झाल्यावर त्याचा भावार्थ कथन करताना ते भावनिक झाले. नेमके या वेळी हृदयविकाराचा  तीव्र झटका आल्याने त्यांचे हृदय थांबले आणि एका शिक्षकाने कर्मभूमी असलेल्या शाळेतच अखेरचा श्वास घेतला.

   अभंगांचा दाखला देताना ते भावविवश झाल्याचे वाटले, पण अभंगांचा दाखला देत असताना नारखेडे यांना हृदयविकाराचा त्रास सुरू झाला, मात्र, ते काहींना ते भावविवश झाल्याचे वाटले. पण वस्तुस्थिती लक्षात येताच डॉक्टरांना बोलावण्यात आले. नंतर यावलला नेल्यावर तपासणी करून नारखेडे यांना मृत घोषित करण्यात आले, नारखेडे यांना अपत्य नव्हते. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, पुतणी असा परिवार आहे.

No comments