बाल संस्कार विद्यालयात शारदा मातेची स्थापना भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल : - येथील बाल संस्कार बालवाडी , ...
बाल संस्कार विद्यालयात शारदा मातेची स्थापना
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल : - येथील बाल संस्कार बालवाडी , बालसंस्कार विद्या मंदीर व बाल संस्कार माध्यमिक विद्यालयात दिनांक २२ सप्टेंबर रोजी संस्थेचे अधक्ष महेश वाणी यांनी सपत्नीक पुजा करून तीन दिवसीय शारदा मातेची स्थापना केली .
अगोदर श्रीहरी कवडीवाले यांच्या घरा पासून शहराच्या मुख्य रस्त्यावरून शारदा मातेची मिरवणूक काढण्यात आली . यात शाळेच्या लहान - लहान विद्यार्थ्यांनी विविध कला पथकांद्वारे आपल्या कला गुणांचे प्रदर्शन केले यात झांज , लेझीम , दांडिया व कळशी पथकांचा समावेश होता . शहरातील लोकांनी लहान मुलांच्या वेशभुशांचे व कला गुणांचे खुप कौतुक केले .
मिरवणूक यशस्वी होण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष महेश वाणी प्राथमिक मुख्याध्याक सुनिल माळी , माध्यमिक मुख्याध्यापक अतुल गर्गे बालवाडी मुख्याध्यापिका शरयु कवडीवाले सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले .


No comments