मानसिक आजारी रुग्णाला त्वरित स्नेहाधार प्रकल्पाने दिला मदतीचा हात सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अहिल्यानगर (दि.४):-श...
मानसिक आजारी रुग्णाला त्वरित स्नेहाधार प्रकल्पाने दिला मदतीचा हात
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि.४):-शहरातील पुणे बसस्थानक येथे कार्यरत असलेले सुरक्षा रक्षक श्री. विनायक गुगले यांनी स्नेहधार हेल्पलाईनशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले मागील तीन दिवसांपासून एक महिला वारंवार बसस्थानक परिसरात थांबत आहे. तिच्यासोबत संवाद करताना ती कोणतीही माहिती देत नाही. यावरून असे समजते की ती अनाथ व बेवारस आहे. स्नेहधार प्रकल्पाच्या कर्मचारी यांनी तत्काळ पुणे बसस्थानकावर भेट देऊन महिलेची विचारपूस केली. महिलेची पूर्णपणे सविस्तर चौकशी करून समुपदेशन केले. तिने आपले नाव शकुंतला कैलास कदम, राहणार करमाळा, जिल्हा सोलापूर असे सांगितले. मात्र कुटुंबाविषयी विचारल्यावर ती विसंगत उत्तरे देत होती. त्यामुळे ती मानसिक आजाराने त्रस्त असल्याचे स्पष्ट झाले.
महिलेची ओळख व परिस्थिती लक्षात घेऊन तिचा फोटो व व्हिडिओ मानसिक आजारी रुग्णांसाठी काम करणाऱ्या मानसग्राम प्रकल्पाचे समन्वयक रमाकांत दोड्डी यांना पाठविण्यात आले. स्नेहाधार व मानसग्राम प्रकल्पाच्या संयुक्त प्रयत्नातून तिच्या पुनर्वसनासाठी आवश्यक सर्व योग्य प्रकारची मदत करण्यात आली. महिलेला कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले. सर्व कायदेशीर औपचारिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तिला सुरक्षितपणे मानसग्राम प्रकल्पामध्ये पुनर्वशीत करण्यात आले.

No comments