adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शिक्षक–विद्यार्थ्यांच्या सहभागातून ‘एक्स्प्लोरिंग झूलॉजी’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

 शिक्षक–विद्यार्थ्यांच्या सहभागातून ‘एक्स्प्लोरिंग झूलॉजी’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद  इदू पिंजारी फैजपूर  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) ध...

 शिक्षक–विद्यार्थ्यांच्या सहभागातून ‘एक्स्प्लोरिंग झूलॉजी’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद 


इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

धनाजी नाना महाविद्यालय, फैजपुर प्राणीशास्त्र विभागाअंतर्गत  एक्स्प्लोरिंग झूलॉजी : प्रेझेंटेशन विथ दी हेल्प ऑफ इन्स्ट्रुमेंटस, चार्टस, मॉडेल्स अँड पोस्टर्स या एक दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.बी. वाघुळदे  यांनी भूषविले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग प्रमुख प्रा. डॉ. सविता वाघमारे कलवले  यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी आयोजना मागचा उद्देश आणि महत्त्व स्पष्ट केला.


त्यांनी प्राणी शास्त्र हा विषय पाठ्यपुस्तकापुरता मर्यादित नसून तो  प्रत्यक्ष कृतीने आणि अनुभवाने समृद्ध होतो असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलन आणि फीत कापून प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे यांनी केले. अध्यक्षीय समारोपामध्ये प्राचार्य डॉ. आर.बी. वाघुळदे यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या मूलभूत संकल्पना चार्टस, मॉडेल्स व पोस्टरच्या मदतीने समजून घेतल्यास कशा समजतात व त्याचा उपयोग आपण पुढील शिक्षणामध्ये व संशोधनामध्ये कशा प्रकारे करू शकतो हे स्पष्ट केले. त्यांनी त्यांच्या भाषणातून विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. मनोहर सुरवाडे, उपप्राचार्य डॉ. कल्पना पाटील उपस्थित होते. स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांचे परीक्षण  पदार्थविज्ञान विभाग प्रमुख डॉ.पी . डी.पाटील आणि रसायनशास्त्र  विभाग प्रमुख प्रा . डी. बी. तायडे  यांनी केले. पोस्टर आणि मॉडेल्स प्रेझेंटेशन मध्ये प्रथम पारितोषिक भूषण खैरे आणि क्षितिज भालेराव यांनी तर द्वितीय पारितोषिक रोहन संजय तडवी आणि रेहान शेख  यांनी तर आणि तृतीय पारितोषिक कु. दिया रवींद्र वायकोळे यांनी पटकाविले. उत्तेजनार्थ बक्षीस इन्सीया इक्बाल बोहरी, प्रथमेश बारे आणि जतीन पाटील यांना मिळाले .  बक्षीस वितरण धरणगाव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय जगताप, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ.पी. डी.पाटील आणि प्राणीशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. सविता वाघमारे कलवले यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमासाठी विविध विभागाचे विभाग प्रमुख आणि शिक्षक वृंद हजर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहीन तडवी तर आभार प्रदर्शन इंन्सिया बोहरी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  प्रा. स्वप्नील शहा, प्रा. किरण फेगडे,  प्रा. उत्कर्षा कोल्हे, प्रा.कविता इंगळे, प्रा.ललिता पाटील, स्नेहल महाजन यांचे अनमोल सहकार्य लाभले. तसेच शिक्षिकेत्तर कर्मचारी श्री  दिलीप मेढे व श्री गणेश चव्हाण  यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने हजर होते.

No comments