adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कोतवाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्यापुढे मोठे आव्हान..अवैध मटका, बिंगो,पत्त्याचे क्लब हद्दीत राजरोसपणे सुरू

 कोतवाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्यापुढे मोठे आव्हान..अवैध मटका, बिंगो,पत्त्याचे क्लब हद्दीत राजरोसपणे सुरू   सचिन मोकळं अहिल्यानग...

 कोतवाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्यापुढे मोठे आव्हान..अवैध मटका, बिंगो,पत्त्याचे क्लब हद्दीत राजरोसपणे सुरू  


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि.२६):- शहरातील महत्त्वाचे आणि अत्यंत संवेदनशील मानले जाणारे कोतवाली पोलीस ठाण्याला आता नवे पोलीस निरीक्षक मिळाले आहे.नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांची कोतवाली पोलीस ठाण्याचे नवे पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी या संदर्भात आदेश काढले आहेत.तीन दिवसांपूर्वी तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांची बदली कंट्रोल मध्ये करण्यात आली होती.संभाजी गायकवाड यापूर्वी नगर जिल्ह्यातील जामखेड व पारनेर पोलीस ठाण्यांवर सेवेत होते.पारनेरवरून त्यांची बदली पुणे जिल्ह्यात झाली होती. त्यानंतर पुन्हा ते अहिल्यानगर जिल्ह्यात दाखल झाले.काही दिवसांपासून नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले गायकवाड आता नव्याने कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक पद भूषवणार आहेत.कोतवाली पोलीस स्टेशन हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहिलेले आहे.व जुने कर्मचारी व नव्याने बदलून आलेले कर्मचारी यांच्यात नेहमीच येथे कुरघोडी होताना दिसून येत आहे ज्यामुळे पोलीस दलाचे नाव ही बदनाम होताना दिसत आहे.नव्याने बदलून आलेले पोलीस निरीक्षक गायकवाड हे नव्या व जुन्या कर्मचाऱ्यांचा एकत्र मेळ साधतील का? व नगर शहरातील मुख्य बाजारपेठेतील व अतिशय संवेदनशील असलेल्या कोतवाली पोलीस स्टेशनचा गाडा व्यवस्थित हाकतील का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडू लागला आहे.या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला असून राजरोसपणे अवैध धंदे सुरू आहे याला रोखण्यात पोलीस निरीक्षक गायकवाड यांना यश येणार की नाही याकडे सर्व शहराचे लक्ष लागले आहे.

No comments