adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल महाराष्ट्र राज्यातील नाशिक विभागाततुन द्वितीय तर जळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांक

 चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल महाराष्ट्र राज्यातील नाशिक विभागाततुन द्वितीय तर जळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांक      ...

 चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल महाराष्ट्र राज्यातील नाशिक विभागाततुन द्वितीय तर जळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांक 


    चोपडा (संजीव शिरसाठ) 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

कृषी उत्पन्न बाजार समितीने आपल्या उत्कृष्ठ,पारदर्शक कामाचा ठसा संपूर्ण नाशिक विभागात उमटवला असून आपल्या पारदर्शक कामाचा,उत्कृष्ट प्रशासनाचा,शेतकरी हिताच्या निर्णयांचा व शेतकऱ्यांसाठी, व्यापाऱ्यांसाठी हमालमापाडी बांधवांसाठी, विविध सेवा सुविधा पुरवून एक उत्कृष्ट सेवा देण्याचे काम केलेले आहे व त्याची दखल म्हणून महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न बाजार समिती संघ पुणे यांनी घेऊन नाशिक विभागात द्वितीय क्रमांकाने तर जळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने चोपडा कृषि बाजार समितीला गौरवण्यात आले या संपूर्ण कामाचे श्रेय बाजार समितीचे सभापती व संचालक मंडळांनी * लोकप्रीय  आमदार आण्णासाहेब प्रा.चंद्रकांत बळीराम सोनवणे व माजी आमदार ताईसाहेब सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे* यांच्या कुशल,सेवाभावी व पारदर्शक नेतृत्वाला दिले,तसेच बाजार समिती उत्कृष्ट चालावी शेतकऱ्यांचे हिताचे निर्णय व्हावेत याच दृष्टिकोनातून निर्णय घेण्याबाबतचे मार्गदर्शन व सुचना विधायक प्रा. चंद्रकांत सोनवणे व पूर्व विधायक सौ.लताताई सोनवणे सदैव दिलेत असे सभापती  नरेंद्र पाटील यांनी सांगितले, तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीत रोहित निकम व .घनश्याम भाऊ अग्रवाल  यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन लाभते असे सांगितले, यावेळी सभापतींनी संपूर्ण संचालक मंडळाचेही सहकार्य असल्याचे सांगितले तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीची भरभराट पन्नास वर्षाच्या कालावधीत कधी दिसून आले नाही की आता दिसल्याने शेतकऱ्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले असुन व सर्वजण सदरील गौरवाबाबतचे कौतुक करीत आहेत.

No comments