जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव यांच्यातर्फे कला उत्सव स्पर्धेचे आयोजन भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) माध...
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव यांच्यातर्फे कला उत्सव स्पर्धेचे आयोजन
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील जिल्हा स्तरीय कला उत्सव 25-26 विद्यार्थ्यांसाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव यांच्यातर्फे कला उत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा अध्यापक विद्यालय एम. जे .कॉलेज परिसर येथे आयोजित करण्यात आल्या. या स्पर्धेत मध्ये अनेक शाळानी भाग घेतला त्या मध्ये व्यास शिक्षण मंडळ संचलित जे टी महाजन इंग्लिश मीडियम स्कूल मधील 9th क्लासची विद्यार्थिनी मिताली किशोर कोल्हे हिने सोलो डान्स या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. व तिची आता नाशिक विभागीय स्तरावर निवड झाली आहे. तिचे संस्थेचे अध्यक्ष मा श्री शरदभाऊ महाजन व संचालक मंडळ ,सेमी विभागाच्या प्राचार्या रंजना महाजन मॅडम व इंग्लिश विभागाच्या प्राचार्य दिपाली धांडे मॅडम यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुद्धा तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

No comments