यावल महाविद्यालयात तिरंगा प्रदर्शन व ध्वजारोहण भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह...
यावल महाविद्यालयात तिरंगा प्रदर्शन व ध्वजारोहण
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाजाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यावल येथे स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली तिरंगा प्रदर्शन करुन ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख मान्यवर अतिथी मराठा विद्या प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ सभासद मा. शहाजीराव पांडुरंग येवले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते तथा मराठा विद्या प्रसारक मंडळाचे सदस्य मा. वसंतराव भोसले व मराठा विद्या प्रसारक मंडळाचे संचालक मा. सुनील भोईटे आदी मान्यवरांसह महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य प्रा अर्जुन पाटील, उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार, उपप्राचार्य डॉ. हेमंत भंगाळे आदी मान्यवर उपस्थित होते. तिरंगा प्रदर्शनादरम्यान यावल बसस्थानक ते महाविद्यालय तिरंगा घेऊन रॅली काढण्यात आली. प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. प्रतिभा रावते यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

No comments