गोपीचंद पडाळकर यांनी केलेल्या बेताल व्यक्तव्याचा निषेध व्यक्त करीत चोपडा शहर पोलिसांना निवेदनाद्वारे कारवाईची मागणी चोपडा प्रतिनिधी (संपाद...
गोपीचंद पडाळकर यांनी केलेल्या बेताल व्यक्तव्याचा निषेध व्यक्त करीत चोपडा शहर पोलिसांना निवेदनाद्वारे कारवाईची मागणी
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पार्टी चोपडा यांच्या वतीने चोपडा शहर पोलिसांना निवेदनाद्वारे कारवाईची मागणी करण्याचे निवेदन सादर करण्यात आले निवेदनात म्हटले आहे की
गोपीचंद पडाळकर या पिसाळलेल्या कुत्र्याने माननीय आमदार श्री. जयंत पाटील साहेब यांच्या बद्दल बेताल व्यक्तव्य केले होते. त्याने केलेल्या व्यक्तव्याने महाराष्ट्रात सामाजिक तेड निर्माण झाले असून त्याच्यावर योग्य कार्यवाही करण्यात यावी व आम्ही त्याचा जाहीर निषेध करीत आहोत. गोपीचंद पडाळकर याला प्रतीकात्मक अटक करण्यात यावी हि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पार्टी यांच्या कडून विनंती आहे:
खालील सह्या करणारे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते
१) डॉ. चंद्रकांत बारेला - रा.कॉं.पा.कार्याध्यक्ष आदिवासी सेल, २) अतूला नाना ठाकरे माजी.चेअरमन चो.सा.का., ३) गोकूळ आबा (माजी व्हाईस चेअरमन चो.सा.का.), ४) मनिलाला मामा पाटील (कुसुंबा) ५) श्री.छन्नू झंडू पाटील (गोरख तात्या ) अशी माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविली आहे


No comments