जिल्हा विधि सेवा प्राधिकरण जळगाव, व नूतन मराठा महाविद्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थिनींसाठी विधी सेवा शिबिर आयोजित जळगाव ...
जिल्हा विधि सेवा प्राधिकरण जळगाव, व नूतन मराठा महाविद्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थिनींसाठी विधी सेवा शिबिर आयोजित
जळगाव प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जिल्हा विधि सेवा प्राधिकरण जळगाव, व नूतन मराठा महाविद्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थिनींसाठी विधी सेवा शिबिर आयोजित: नूतन मराठा महाविद्यालयात आज दिनांक 26 सप्टेंबर २०२५ रोजी महाविद्यालयाच्या वातानुकूलित बोस सभागृहात विधी सेवा शिबिर खास विद्यार्थिनींसाठी जिल्हा विधि सेवा प्राधिकरण जळगाव, व नूतन मराठा महाविद्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य डॉ. एल .पी. देशमुख यांच्या मार्गदर्शनाने आयोजित करण्यात आले होते यात प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा विधी प्राधीकरण जळगाव यांच्यातर्फे ॲड .शिल्पा रावेरकर ॲड .संगीता ढगे यांनी महाविद्यालयीन विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले ह्यात त्यांनी महाविद्यालयीन विद्यार्थिनींसाठी कोणकोणते कायदे आहेत त्याचा आपत्कालीन परिस्थितीत कसा उपयोग होऊ शकतो व आपत्कालीन परिस्थितीत कोणत्या नंबरवर कॉल करायला पाहिजे
तसेच सायबर क्राईम साठी कोणती वेबसाईट आहे याची इत्यंभूत व महत्त्वपूर्ण माहिती दिली व विद्यार्थिनींनी कशा सक्षम बनू शकतात याबाबत अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले, याप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थिनी उपस्थित होत्या व त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचे अतिशय समर्पक उत्तरे ॲड .शिल्पा रावेरकर व ॲड .संगीता ढगे यांनी दिली, तसेच महाविद्यालयीन कोणत्याही गरजू विद्यार्थिनींना काही अडचण आली तर मोफत न्यायालयीन सल्ल्यासाठी केव्हाही आम्ही उपलब्ध राहू असे सांगितले, यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे उप प्राचार्य डॉ. के .बी पाटील म्हणून उपस्थित होते, तसेच डॉ एन जे पाटील प्रा.आर. बी. देशमुख, प्रा. मंगला तायडे मॅडम, प्रा. वंदना पाटील मॅडम, प्रा. केतन शिरतुरे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले तर प्रा. सुशील निकम यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. तेजल पाटील मॅडम यांनी आभार मानले सदर कार्यक्रम महाविद्यालयाच्या इतिहास विभागाकडून आयोजित करण्यात आला होता.



No comments