adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

"I Love Muhammad" लिहिल्यामुळे होत असलेल्या कार्यवाही च्या निषेधार्थ फैजपूर कौमी एकता फाउंडेशनचे प्रांतअधिकारी यांना निवेदन.

 "I Love Muhammad" लिहिल्यामुळे होत असलेल्या कार्यवाही च्या निषेधार्थ  फैजपूर कौमी एकता फाउंडेशनचे प्रांतअधिकारी यांना निवेदन.  इद...

 "I Love Muhammad" लिहिल्यामुळे होत असलेल्या कार्यवाही च्या निषेधार्थ 

फैजपूर कौमी एकता फाउंडेशनचे प्रांतअधिकारी यांना निवेदन. 



इदू पिंजारी फैजपूर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

सध्या देशातील विविध ठिकाणी वेगवेगळ्या भागात "आय लव्ह मोहम्मद" असे लिहिल्यामुळे नागरिकांवर गुन्हे दाखल करण्याचे प्रकार समोर येत आहे. अलीकडे 'कानपूर (उत्तरप्रदेश) येथे २५ जणांवर तर ग्रोधा (गुजरात) येथे ८८ जणांवर फक्त "आय लव्ह मोहम्मद"

 लिहिल्यामुळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या शिवाय इतर ठिकाणी अश्या प्रकारची कारवाई आपल्या स्वतंत्र व संविधानिक देशात सुरू असून आय लव्ह मोहम्मद हा वाक्यप्रचार कोणत्याही प्रकारे असभ्य आक्षेपार्ह किंवा असंवैधानिक नाही. हा फक्त धार्मिक प्रेम व आदर व्यक्त करण्याचा मार्ग आहे आणि बारा - वफात सण ईद-ए-मिलाद साजरा करतांना त्या वेळेस होर्डिग बॅनर लावले असताना त्यावर गुन्हे नोंद होणे योग्य नाही तसेच भारताच्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला आपल्या धर्मा बद्दल प्रेम, आदर व्यक्त करण्याच्या तसेच स्वतंत्रपणे आपल्या विचार मांडण्याचे सोबत आपला धर्म, मजहब, जातीचे विचार जोपसण्याचे अभिस्वातंत्र्य व हक्क दिला आहे. कलम १९(१) (२) च्या आधारावर प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याची हमी देते. कलम २५ प्रत्येक नागरिकाला आपआपले धर्माचे पालन आणि प्रचार करण्याचे स्वातंत्र्य देते. कलम २१ नागरिकांना जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार देते. "मी मुहम्मदवर प्रेम करतो" हा कोणत्याही धर्माचा अपमान नाही. तर प्रेम आणि श्रद्धेचा एक सकारात्मक संकेत आहे. या आधारावर खटला दाखल करणे म्हणजे लोकशाही आणि संविधानाच्या आत्म्यावर हल्ला करणे सारखे आहे.त्यामुळे अशा प्रकारच्या निष्णकारण कारवाया थांबविण्यासाठी तसेच समाजातील सामाजिक सौदार्य व शांतता टिकविण्यासाठी शासन पातळीवर योग्य पाऊले उचलून पोलिस प्रशासनाने याबाबत संवेदनशीलतेने निर्णय घेणे अत्यंत आवश्यक आहे. असे निवेदनात म्हटले आहे.या प्रसंगी कौमी एकता फाउंडेशन चे अध्यक्ष शेख कुर्बान, उपाध्यक्ष शेख इरफान, सय्यद असगर, सचिव सय्यद जावेद, शेख हमीद, फारुख अब्दुल्ला, हनीफ पहेलवान, कलीम मेंबर,शेख इसहाक, शेख आरिफ,आरिफ खान, मोहसीन खान, हकीम खान आदी सह समाज बांधव उपस्थित होते.

No comments