adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी संदर्भात प्रदेशाध्यक्षांचा श्रीरामपूर दौरा मूळ ओबीसीं वर शिवसेनेकडून कुठलाही अन्याय होणार नाही; प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब किसवे

  स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी संदर्भात प्रदेशाध्यक्षांचा श्रीरामपूर दौरा  मूळ ओबीसीं वर शिवसेनेकडून कुठलाही अन्याय होणार नाही; प्रदेशाध...

 स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी संदर्भात प्रदेशाध्यक्षांचा श्रीरामपूर दौरा 

मूळ ओबीसीं वर शिवसेनेकडून कुठलाही अन्याय होणार नाही; प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब किसवे 


श्रीरामपूर / प्रतिनिधी :

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

आगामी काळात होऊ घातलेल्या (जिल्हा परिषद,पंचायत समिती, ग्रामपंचायत) या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भात राज्याचे ओबीसी/व्हीजेएनटी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब किसवे यांचा अहिल्यानगर उत्तर येथील, श्रीरामपूर ला सदिच्छा भेट दिली. असता श्रीरामपूर शिवसेना पदाधिकारी यांच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले तसेच जिजामाता चौक श्रीरामपूर येथेल माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे यांच्या मंडळाची आरती करून सत्कार करण्यात आला तसेच मेन रोड वरील महात्मा गांधी चौक याठिकाणी मा.जिल्हाध्यक्ष श्री. राजेंद्र देवकर यांच्या शिवसेना शारदा उत्सव मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

श्रीरामपूर येथील व्हीआयपी रेस्ट हाऊस येथील बैठकी दरम्यान जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगर परिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येण्यासाठी व शिवसेना पक्ष वाढीसाठी प्रदेशाध्यक्ष यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

याप्रसंगी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे , तालुकाध्यक्ष संतोष डहाळे , नीरज भैय्या मुरकुटे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सारिका वाव्हळ, उपजिल्हाप्रमुख संजय बाहुले यांनी मनोगत व्यक्त केले. 

प्रसंगी प्रदेशाध्यक्ष किसवे म्हणाले की, विकासाच्या आणि कल्याणाच्या योजना चा प्रचार आणि प्रसार करून शिवसेना पक्ष आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचा लोकहिताचा विचार समाजात समजून सांगणे आणि ओबीसी / व्हिजेएनटी समाजातील सर्व जातीतील जनता  शिवसेनेशी घट्ट जोडावी या व्यापक उद्देशाने राज्यातील संपूर्ण जिल्ह्यात मतदार संघात संघटनात्मक दौरा करून पक्ष बांधणी मजबूत करण्यात येत आहे.

    तसेच ओबीसी / व्हिजेएनटी च्या कुठल्याही आरक्षणाला कुठल्याही पद्धतीने धक्का न लावता ते आरक्षण दिलेले आहे. त्यामुळे मूळ ओबीसीवर कुठलाही अन्याय होणार नाही याबाबत उप  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओबीसी / व्हिजेएनटी चा विचार केलेला आहे असे प्रदेशाध्यक्ष किसवे यांनी सांगितले.

 . यावेळीअहिल्यनगर  उत्तर शिवसेना   ओबीसी / व्हिजेएनटी चे श्रीरामपूर रेस्ट हाऊस येथे शिवसेना सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांचे वतीने प्रदेशाध्यक्ष किसवे यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी शहर अध्यक्ष विठ्ठल गोराणे, तालुका अध्यक्ष सागर कुदळे, उप जिल्हा प्रमुख निलेश शिंदे, मा.नगरसेवक संतोष कांबळे, विशाल दुर्गे, राजेश वाव्हळ,उप तालुका प्रमुख संभाजी देवकर,राहुरी तालुका प्रमुख प्रशांत खळेकर,उप शहर अध्यक्ष गिरीश वाढेकर , शहर अध्यक्षा महिला सविता किशोर वडिले ,रवींद्र जाधव, सुनील फुलारे,अरुण जाधव,अशोक साळुंखे, देविदास दुधळे,अमोल शिंदे,महेश दाने,सोहम चिंधे, आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वृत्त विशेष सहयोग

पत्रकार विठ्ठल गोराणे - श्रीरामपूर 


वृत्त प्रसिद्धी सहयोग

समता मीडिया सर्व्हिसेस 

 श्रीरामपूर - 9561174111

No comments