नंदुरबार जिल्हाच नव्हे तर संपूर्ण राज्य आणी देश कॉंग्रेसमय होणार - सपकाळ कॉंग्रेस सेवा दल नंदुरबार जिल्हाध्यक्ष एजाजभाई बागवान यांनी घेतली...
नंदुरबार जिल्हाच नव्हे तर संपूर्ण राज्य आणी देश कॉंग्रेसमय होणार - सपकाळ
कॉंग्रेस सेवा दल नंदुरबार जिल्हाध्यक्ष एजाजभाई बागवान यांनी घेतली कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट
नंदुरबार / प्रतिनिधी:
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
नंदुरबार जिल्हा हा पुर्वीपासूनच कॉंग्रेसमय राहिला आहे, परंतु काही संधी साधूंनी सध्या जी काही अराजगता माजवली आहे त्यातून प्रत्येक जनमाणसाच्या मनात प्रचंड चीड निर्माण झाली असुन येत्या काळात केवळ महाराष्ट्र राज्यच नव्हे तर संपुर्ण देश कॉंग्रेसमय होणार असल्याचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष मा.आ.हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.
कॉंग्रेस सेवा दल नंदुरबार जिल्हाध्यक्ष एजाजभाई बागवान यांनी नुकतेच मुंबईतील दादर येथील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मुख्य कार्यालयात कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.आ.हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली.
या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी नंदुरबार जिल्ह्यातील नागरीकांच्या विविध समस्या आणी आडचणी तसेच पक्ष संघटन बांधणी तथा पुढे होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समीती, ग्रामपंचायत,नगर पालिका, महानगर पालिका (स्वराज्य संस्था) निवडणुका आदी महत्त्वाच्या विषयी श्री. बागवान यांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष श्री.सपकाळ यांच्याशी सविस्तर चर्चा करुन त्यांच्या सुचना आणी मार्गदर्शन प्राप्त केले.
येत्या काही दिवसात कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष मा.हर्षवर्धन सपकाळ यांचा नंदूरबार जिल्हा दौरा होणार असुन या निमित्ताने कॉंग्रेसच्या भव्य अशा मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे,
या मेळाव्यात इतर काही पक्षातील नेते, कार्यकर्ते आणी काही सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे कॉंग्रेस सेवा दल नंदुरबार जिल्हाध्यक्ष श्री.एजाजभाई बागवान यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
----------------------------------------------------
No comments