adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

१७ सप्टेंबर ला जिल्हाधिकारी कार्यालयावर "शेतकरी जन आक्रोश मोर्चा" चोपड्याला नियोजन बैठक

१७ सप्टेंबर ला जिल्हाधिकारी कार्यालयावर "शेतकरी जन आक्रोश मोर्चा" चोपड्याला नियोजन बैठक  चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकव...

१७ सप्टेंबर ला जिल्हाधिकारी कार्यालयावर "शेतकरी जन आक्रोश मोर्चा" चोपड्याला नियोजन बैठक 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्यातील शेतकरी रजंले गाजले आहेत केंद्र सरकारने कापूस आयात शुल्क कमी केल्याने शेतकऱ्यांच्या घरात कापूस येण्याअगोदर कापसाचे भाव कमी झाले आहेत. खरिपातील पिक विमा योजनेचे निकष बदलल्याने या वर्षी विमाधारक शेतकऱ्यांना मागचे निकष लावून खरिपातील पिक विमा योजनेत सहभागी असलेल्या शेतकऱ्यांना पिक विमा द्यावा केळी चा बोर्ड भावाप्रमाणे केळी खरेदी करावी तसेच केळी पिक विमा शेतकऱ्यांचे खात्यांवर १५ सप्टेंबर च्या आत पिक विम्याची रक्कम द्यावी व महायुतीने विधानसभेच्या निवडणुकीत कर्जमाफी चे आश्वासन पाळून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी जिल्ह्यातील सर्व समविचारी संघटना व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन आपापले झेंडे बाजूला ठेवून शासनाचा निषेध दर्शविणारा काळा रंगाचा झेंड्याखाली एकत्र येऊन शेतकरी जन आक्रोश मोर्चा समिती स्थापन करून प्रत्येक तालुक्यात नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात येत आहे‌

१२ सप्टेंबरला नियोजन बैठक पार पडली या बैठकीत माजी खासदार उन्मेष पाटील, गुलाबराव वाघ, शेतकरी संघटनेचे संदीप पाटील, शेतकरी कृती समितीचे एस. बी. पाटील, देवेंद्र सोनवणे, प्रा. प्रदीप पाटील यांनी मत व्यक्त केलं यावेळी भानुदास पाटील, प्रकाश पाटील, डॉ चंद्रकांत बारेला, उर्वेश साळुंखे यांच्या तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते 

 ♦️"शेतकरी जन आक्रोश मोर्चा"

 ♦️राजकीय पक्ष विरहित

दिनांक १७ सप्टेंबर २०२५

बुधवार रोजी

दुपारी ०२.०० वाजता

♦️स्थळ...!

 @ छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या पासून ( कोर्ट चौक ) ते जिल्हाधिकारी कार्यालय जळगांव

या ठिकाणी आयोजित केला असून हजारोंच्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती

🔸आपले विनीत

शेतकरी जन आक्रोश मोर्चा समिती जळगाव जिल्हा

No comments