adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

स्पर्धा परीक्षेतील यशासाठी व्यक्तिमत्व विकास, वाचन, सातत्य व कठोर परिश्रमाची आवश्यकता' :- नारायण पाटील

 स्पर्धा परीक्षेतील यशासाठी व्यक्तिमत्व विकास, वाचन, सातत्य व कठोर परिश्रमाची आवश्यकता' :- नारायण पाटील  चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेम...

 स्पर्धा परीक्षेतील यशासाठी व्यक्तिमत्व विकास, वाचन, सातत्य व कठोर परिश्रमाची आवश्यकता' :- नारायण पाटील 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा : येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय व द युनिक अकॅडमी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 'पदवी काळात युपीएसी / एमपीएससी स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी'? या विषयावर आधारित मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शक व युनिक अकॅडमीचे नारायण पाटील, नरेंद्र पाटील, उपप्राचार्य प्रा. ए. बी. सूर्यवंशी, समन्वयक डॉ. एस. ए. वाघ, सौ. एम. टी. शिंदे, स्पर्धा परीक्षा समन्वयक डॉ. आर. आर. पाटील, करिअर कट्टाचे समन्वयक वाय. एन. पाटील, डॉ. सौ. के. एस. क्षीरसागर आदि उपस्थित होते. 


     या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना डॉ. आर. आर. पाटील यांनी कार्यक्रम आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. 

      यावेळी मनोगत व्यक्त करतांना समन्वयक डॉ. एस. ए. वाघ यांनी स्पर्धा परीक्षेसाठी सकारात्मक मानसिकता व सखोल अभ्यास व विचारांची आवश्यकता असते. विद्यार्थ्यांनी स्वतःतील क्षमता ओळखून वेळ, श्रम व कठोर परिश्रमाची गरज असल्याचे सांगितले.

   यावेळी 'पदवी काळात युपीएससी/युपीएससी स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी? या विषयावर मार्गदर्शन करताना म्हणाले की, 'स्पर्धा परीक्षेसाठी लेखन सराव करावा. संकल्पना स्पष्ट समजून घेणे गरजेचे आहे. सोशल मीडियापासून दूर रहावे. चौकस बुद्धिमत्ता हवी.मोठी स्वप्न बघून त्या दिशेने यशस्वी मार्गक्रमण करावे.व्यक्तिमत्व विकास साधावा.'

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे मार्गदर्शन करतांना म्हणाले की, 'स्पर्धा परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी अभ्यासक्रमाची ओळख करून घ्यावी. मराठी व्याकरण संकल्पना समजून घ्याव्यात. सखोल अभ्यास, अद्ययावत ज्ञान, तर्कबुद्धी यांची आवश्यकता असते. निबंध लेखन, सारांश लेखन, उतारा आकलन, अनुवाद यांचा सराव करावा.'

  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मुकेश पाटील यांनी केले तर आभार वाय. एन. पाटील यांनी मानले. या कार्यक्रमाच्या प्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू-, भगिनी उपस्थित होते.

No comments