adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

निंभोरा पोलीसांची धडाकेबाज कामगिरी! चोरीचा गुन्हा १० लाखांचा मुद्देमाल हस्तगत करीत एका महिलेसह ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल.तर एक आरोपी फरार आहे.

  निंभोरा पोलीसांची धडाकेबाज कामगिरी!  चोरीचा गुन्हा १० लाखांचा मुद्देमाल  हस्तगत करीत एका महिलेसह ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल.तर एक आरोपी फरा...

 निंभोरा पोलीसांची धडाकेबाज कामगिरी! 

चोरीचा गुन्हा १० लाखांचा मुद्देमाल  हस्तगत करीत एका महिलेसह ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल.तर एक आरोपी फरार आहे.  

रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

रावेर तालुक्यातील निंभोरा, बलवाडी, धामोडी येथे झालेल्या चोरीच्या प्रकरणात निंभोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे यांच्या सह पोलीस कर्मचारी यांनी कौतुकास्पद धडाकेबाज कामगिरी करून शेती साहित्य तसेच मौल्यवान वस्तू चोरी करणाऱ्या टोळीला अटक करून उल्लेखनीय कामगिरी केली निंभोरा पोलीस ठाण्यात एका महिलेसह ६ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात एक आरोपी फरार आहे.निंभोरा पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत तर पोलिसांनी आरोपींकडून १० लाख रुपयांच्या मौल्यवान वस्तू जप्त केल्या आहेत आणि अटक केलेल्या सर्व आरोपींना न्यायालयाने पोलिस कोठडीत पाठवले आहे. रावेर तालुक्यातील बलवाडी, निंभोरा, धामोडी येथे झालेल्या चोरीची गुप्त माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय हरिदास बोचरे, एएसआय ममता तडवी, पीएसआय दीपाली पाटील, पो कॉ अविनाश पाटील, हवालदार सुरेश अढायंगे, पो.कॉ.अमोल वाघ, पो.कॉ.किरण जाधव, चालक योगेश चौधरी व केदारे यांच्यासह परेश सोनवणे, पो.कॉ.रिझवान पिंजारी, पो.कॉ.सरफराज तडवी, पो.कॉ.रशीद तडवी, पो.कॉ.रशीद तडवी, पो.कॉ भूषण सोनवणे, पो.कॉ.व्ही.व्ही. सोनवणे, चालक सोनवणे याला सकाळी साडेदहा वाजता अटक करण्यात आली.  संशयित योगिता सुनील कोळी (वय 40) हिच्या घराची झडती घेतली. काही चोरीच्या वस्तू सापडल्या असून महिलेने संशयास्पद उत्तरे दिली होती. यानंतर या गुन्ह्यातील संशयित विलास उर्फ ​​काळू सुपडू वाघोडे (वडगाव), स्वप्नील वासुदेव चौधरी (वय 35, निंभोरा), जमील अब्दुल तडवी (वय 40 वडगाव), आकाश मधुकर गोंधळी (वय 29, शिरसाळा, ता. बोडगाव), बोडगावकर (वय 29, रा. बोडगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरसाळा, ता. बोदवड). यापैकी विलास उर्फ ​​काळू सुपडू वाघोडे हा फरार आहे. पोलिसांनी माहिती दाखवताच आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली चारचाकी गाडी आणि सुमारे १० लाख किमतीच्या मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आल्या. संशयित आरोपींना यावल, निंभोरा, सावदा, रावेर आणि इतर भागातून चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान पोलिसांनी ३ दुचाकी, शेतीची उपकरणे आणि इतर वस्तू जप्त केल्या आहेत. या सर्व संशयित आरोपींना रावेर न्यायालयात हजर करण्यात आले. यामध्ये, महिला संशयिताला १५ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर पुरुष आरोपींना १६ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, बालवाडी येथील सुमित गोपाल पाटील, निंभोरा येथील राजू वसंत भोगे आणि धामोडी येथील भूषण पाटील यांच्या तक्रारीवरून निंभोरा पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments