adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सनपुले आश्रमशाळेच्या खेळाडूंची प्रकल्पस्तरीय स्पर्धेसाठी निवड;बीट स्तरीय वैयक्तिक स्पर्धेत उत्तम कामगिरी

 सनपुले आश्रमशाळेच्या खेळाडूंची प्रकल्पस्तरीय स्पर्धेसाठी निवड;बीट स्तरीय वैयक्तिक स्पर्धेत उत्तम कामगिरी  चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमका...

 सनपुले आश्रमशाळेच्या खेळाडूंची प्रकल्पस्तरीय स्पर्धेसाठी निवड;बीट स्तरीय वैयक्तिक स्पर्धेत उत्तम कामगिरी 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

आदिवासी खेळाडू हे जन्मजातच  काटक असतात परिश्रम आणि जिद्दीने पुढे जातांना कुठलीही गोष्ट त्यांना अशक्य नाही हे पुन्हा एकदा अधोरेखित करत सनपुले आश्रमशाळेच्या खेळाडूंनी मैदान गाजवले आहे.दिनांक २१ सप्टेंबर रोजी चोपडा येथील महात्मा गांधी महाविद्यालयाचा मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या वैयक्तिक स्वरूपाच्या स्पर्धेमध्ये सहभागी होत 


अनेक विद्यार्थ्यांनी नंबर पटकाविले.यात धावण्याच्या स्पर्धेत १७ वर्षे वयोगटात (१००,२००, ४००मीटर)सयाराम मन्साराम बारेला प्रथम,१९वर्षे वयोगटात राधेश्याम सायसिंग पावरा (४००मी.)प्रथम,रविन भिला बारेला (८००मी) व (१५००मी.)प्रथम,दिनेश गंगाराम पावरा(३०००मी.)प्रथम,फेक स्पर्धेत अनिल बद्री बारेला (थाळी फेक)प्रथम, सखाराम सिंह जी पावरा (गोळा फेक) प्रथम.रीले शर्यतीत १७ वर्षे वयोगटात ४×१००,४×४००व १९ वर्ष आतील वयोगटात तिघेही संघातील खेळाडूंना प्रथम क्रमांक मिळाले आहेत. उडी स्पर्धेत सयाराम मन्साराम बारेला (लांब उडी)प्रथम,पूजा करमसिंग पावरा(लांब उडी) प्रथम,रोहन रोहिदास पावरा (उंच उडी)द्वितीय आणि अन्य खेळाडूंनी द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केले. या स्पर्धेत प्रथम आलेले व द्विती आलेल्या घड्याळ उंची निवड प्रकल्प स्थळे क्रीडा स्पर्धेमध्ये करण्यात आले असून त्यांच्या या मेहनती बद्दल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यावल  येथील प्रकल्प अधिकारी अरुणजी पवार,सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रशांत माहुरे,पवन पाटील,संदीप पाटील,शिक्षण विस्तार अधिकारी एल.एम. पाटील,मीनाक्षी सुलताने,व्ही.डी. गायकवाड,चोपडा बीट प्रमुख राजेंद्रजी मुसळे यांनी कौतुक केले.तर संस्थेचे अध्यक्ष प्रकाश जगन्नाथ पाटील,सचिव गणेश भागवत पाटील,मुख्याध्यापक नितीन पाटील,चंद्रकांत पाटील,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी,क्रीडाशिक्षक,संघ व्यवस्थापक यांनी अभिनंदन केले आहे.

No comments