उकाड्याची तमा न बाळगता आदिवासी विद्यार्थ्यांनी गाजवले मैदान;५६२ खेळाडू सहभागी चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) एकात्मिक आदिवास...
उकाड्याची तमा न बाळगता आदिवासी विद्यार्थ्यांनी गाजवले मैदान;५६२ खेळाडू सहभागी
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यावल अंतर्गत चोपडा येथील महात्मा गांधी महाविद्यालयाच्या मैदानावर वैयक्तिक स्वरूपाच्या चोपडा बीट स्तरीय क्रीडास्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.आठ अनुदानित व पाच शासकीय अशा १३ आश्रमशाळांचे ५६२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.१००,२००,४००,८००,१५००,३०००मीटर धावणे,४×१००,४×४००रिले, लांब उडी,उंच उडी,थाडी,गोळा,भाला फेक,३०००मीटर अंतर चालणे अशा स्पर्धांचा यात समावेश होता.अनेकांनी यात आपले कौशल्य पणाला लावले.पितृपक्षातील शेवटचा दिवस आणि प्रचंड उकाळा असूनही अनेक खेळाडूंनी संपूर्ण ताकतीचा उपयोग करत प्रथम आणि द्वितीय क्रमांक प्राप्त केले. विजयी खेळाडूंना प्रकल्प स्तरीय खेळासाठी निवडण्यात आले आहे.प्रकल्प अधिकारी अरुणजी पवार यांनी चोपडा बीट मधील विजेता खेळाडूंचे अभिनंदन केले व आगामी सांघिक खेळात देखील उत्तम कामगिरी करण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान सकाळच्या सत्रात उद्घाटन व खेळ प्रतिज्ञा घेण्यात आली.याप्रसंगी सहाय्यक प्रकल्प अधिकारी पवन पाटील आणि संदीप पाटील तसेच शिक्षण विस्तार अधिकारी मीनाक्षी सुलताने,चोपडा बीट चे समन्वयक व कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्रजी मुसळे,बीटस्तरीय क्रीडा समिती प्रमुख ज्ञानेश्वर महाजन,सतीश पाटील,विविध शाळांचे मुख्याध्यापक,क्रीडा शिक्षक,संघ व्यवस्थापक,महिला अधीक्षिका तसेच वर्गचार कर्मचारी उपस्थित होते.मैदान आणि तत्सम सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थेचे यावेळी आभार व्यक्त करण्यात आले.


No comments