भटक्या विमुक्तांची स्वातंत्र्य परीषद संपन्न. लातूर जि. प्र.(उत्तम माने) (संपादक -:- हेमकांत गायकवाड) भारतीय भटक्या विमुक्त जमाती विकास सं...
भटक्या विमुक्तांची स्वातंत्र्य परीषद संपन्न.
लातूर जि. प्र.(उत्तम माने)
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
भारतीय भटक्या विमुक्त जमाती विकास संघटनेच्या वतीने 31 ऑगस्ट रोजी कांग्रेस भवन येथे स्वातंत्र्य परीषद आयोजित करण्यात आली होती. 1952मध्ये याच दिवशी पहीले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सोलापुरात सेटलमेंट मध्ये बंदिस्त असलेल्या भटक्या विमुक्तांना तारा तोडून मुक्त केले होते. तो दिवस सर्व भटके विमुक्त स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतात. भटक्या विमुक्त जमाती साठी हा दिवस महत्त्व चा मानला जातो.
लातूरात झालेल्या या परिषदेत भटक्या विमुक्त जमाती च्या सद्यस्थिती वर आणि भविष्यातील आव्हानां वर चर्चा करण्यात आली.
या परिषदेच्या अध्यक्षस्थानी भटक्या विमुक्तांचे नेते प्रा सुधीर अनवले होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून कामगार नेते राजकुमार होळीकर, प्राचार्य एकनाथ पाटील, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, विद्रोही सांस्कृतिक सांस्कृतिक चळवळी चे धनाजी गुरव, कांग्रेस चे शहर जिल्हा ध्यक्ष किरण जाधव हे उपस्थित होते. परिषदेचे प्रास्ताविक दत्ता सोमवंशी यांनी केले.
या स्वातंत्र्य परीषदेला जोशी, कैकाडी, घिसाडी, माती वडार, गाडी वडार, भोई, मसणजोगी, वासुदेव, गोंधळी, पारधी, भिल्ल, नाथ जोगी, गोसावी, कोल्हाटी, बेरड रामोशी, पाथरुट, वैदू, चंदन वाले या जमातींचा जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता.
भटक्या विमुक्त जमाती दलितां पेक्षा दलित आहेत. या जमाती गरीब आहेत. त्यांना योग्य नेतृत्व मिळालेले नाही. त्यामुळे या पुढील काळात मजबूत संघटन गरजेचे आहे. या स्वातंत्र्य परिषदेचे सत्यवान कांबळे यांनी केले.

No comments