कृषि उत्पन्न बाजार समिती, चोपडा यांचेकडून तालुक्यातील कापुस उत्पादक शेतकरी वर्गास कापुस विक्रीसाठी नाव नोंदणीचे आवाहन चोपडा प्रतिनिधी (संप...
कृषि उत्पन्न बाजार समिती, चोपडा यांचेकडून तालुक्यातील कापुस उत्पादक शेतकरी वर्गास कापुस विक्रीसाठी नाव नोंदणीचे आवाहन
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा बाजार समितीच्या वतीने सीसीआय कापुस खरेदी केंद्रात कापुस विक्रीसाठी शेतकऱ्यांनी कपास किसान मोबाईल अँपव्दारे मुदतीत नोंदणी करण्याचे आवाहन बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील यांनी केले आहे बाजार समितीच्या वतीने सीसीआय कापुस खरेदी केंद्र लवकरच सुरु होणार असुन सन २०२५-२०२६ या हंगामासाठी ८११० प्रति क्विंटल भाव राहणार आहे कापुस उत्पादकांनी कापुस विक्रीसाठी मुदतीत नांव नोंदणीसाठी प्लेस्टोअर वरून कपास किसान अँप डाऊनलोड करून नोंदणी करावी कापुस खरेदी प्रक्रिया पारदर्शक व सुरळीत व्हावी शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर जास्त वेळ थांबावे लागू नये शेतकऱ्यांची खरेदी केंद्रावर गर्दी होऊ नये यासाठी ही सुविधा करण्यांत आली आहे दिनांक ०१/०९/२०२५ चे ३०/०९/२०२५ दरम्यान कापुस विक्रीसाठीची नावनोंदणी करावी त्यामुळे शेतकऱ्यांना सोयीनुसार विक्रीची तारीख व खरेदी केंद्र निश्चित करता येणार आहे सर्व प्रक्रिया मोबाईल वरच होणार असुन शेतकऱ्यांनी २०२५-२०२६ च्या हंगामाचा कापुस पीकपेरा सातबारा उतारा, आधारकार्ड, फोटो, मोबाईल सोबत ठेवावा मुदतीत नोंदणी करावी काही अडचण आल्यास बाजार समितीशी संपर्क साधण्याचे आवाहन सभापती, उपसभापती व सर्व संचालक मंडळ यानी केले आहे.

No comments