आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनानिमित्त आव्हाणे ग्रामपंचायत कार्यालयात जनजागृती अभियान भ्रष्टाचारमुक्त व पारदर्शक कारभारासाठी नागरिकांसाठी म...
आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनानिमित्त आव्हाणे ग्रामपंचायत कार्यालयात जनजागृती अभियान
भ्रष्टाचारमुक्त व पारदर्शक कारभारासाठी नागरिकांसाठी माहिती अधिकार हे प्रभावी शस्त्र :– बापुसाहेब भगवान चौधरी यांचे प्रतिपादन
जळगाव (प्रतिनिधी)–
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनाचे औचित्य साधून आव्हाणे ग्रामपंचायत कार्यालयात माहिती अधिकार जनजागृतीअभियानाचे आयोजन करण्यात आले
या कार्यक्रमास माहिती अधिकार तथा सामाजिक कार्यकर्ते बापुसाहेब भगवान चौधरी यांनीकार्यक्रमात माहिती अधिकार कायद्याविषयी मार्गदर्शन करतांना माहिती अधिकार कायदा हा प्रशासनाचे नागरीकाप्रती असलेले ऊत्तर दायित्व सिद्ध करणारा आहे माहिती ही लोकशाहीचा गाभा असुन कोणत्याही लोकशाही यंत्रणेच्या प्रभावी कामकाजासाठी नागरीकांना माहिती मिळणे अत्यावश्यक असते आणि तो अधिकार नागरीकांना या कायद्याने दिला आहे म्हणून नागरिकांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन जनहितार्थ भ्रष्टाचारमुक्त व पारदर्शक प्रशासनासाठी माहिती अधिकार कायदा हे प्रभावी शस्त्र असुन त्याचा वापर प्रशासनात माहिती मिळवण्यासाठी करावा असे आवहान श्री चौधरी यांनी उपस्थितांना केले. याप्रसंगी सरपंच पती भगवान नामदेव पाटील यांनी श्री चौधरी यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला सदर अभियानादरम्यान उपस्थितांनी पारदर्शकता व जबाबदारीसाठी माहिती अधिकाराचा जागरूकतेने उपयोग करण्याचा संकल्प केला

No comments