प्रा.संजय नेवे यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) भगिनी मंडळ चोपडा संचलि...
प्रा.संजय नेवे यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
भगिनी मंडळ चोपडा संचलित ललित कला केंद्र चोपडा येथील चित्रकला महाविद्यालयातील प्रा.संजय मनोहर नेवे यांना शिर्डी संस्थान पालखी निवारा येथे *बी द चेंज फाउंडेशन*....चला बदल घडवूया याद्वारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2025 सोहळ्यात नुकतेच राज्य आदर्श शिक्षक 2025 म्हणून सन्मानित करण्यात आले.
आपल्या गुणवत्ता पूर्ण कार्यासाठी कलाशिक्षण क्षेत्रातील योगदान व समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याच्या दृष्टीने धडपड करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यात आला. त्यात प्रा.संजय नेवे यांना मानचिन्ह,सन्मानपत्र व शाल देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी शिर्डी परिसराचे प्रसिद्ध डॉ. सुजय विखे पाटील,माजी लोकसभा सदस्य हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
आदर्श शिक्षकांना त्यांच्या हस्ते शाल, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले तर मा.श्री.गोरक्ष गाडेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी,श्री साईबाबा संस्थान शिर्डी ट्रस्ट व बी द चेंज चे सर्व पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्यातील प्रथम महाविजेते 36 आदर्श शिक्षकांना पुरस्कार एक मोबाईल भेट म्हणून बक्षीस देण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व शिक्षकांना मी वंदन करतो व या संस्थेद्वारे सन्मान केल्या जाणाऱ्या सर्व आदर्श शिक्षकांच्या सेवेसाठी त्यांच्या निष्ठे साठी समर्पण भावनेसाठी व केलेल्या अथक प्रयत्नांसाठी भरभरून शुभेच्छा देतो असं ते म्हणाले
प्रा.संजय नेवे यांचे भगिनी मंडळाच्या अध्यक्षा सौ. पूनम आशिषलाल गुजराथी, सहसचिव अश्विनी प्रसन्नलाल गुजराथी, उपप्राचार्य आशिष गुजराथी समाजकार्य महाविद्यालय, राजेद्र महाजन, सेवानिवृत्त प्राचार्य, प्रा.जी.व्ही.साळी, से.नि., प्राचार्य सुनील बारी, ललित कला केंद्र चोपडा, प्रा.विनोद पाटील, श्री.भगवान बारी, श्री.अतुल अडावकर, प्रवीण मानकरी व समस्त विद्यार्थी परिवार आणि संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कौतुक करुन अभिनंदन केले.

No comments