सौ.शोभा वारके यांना राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार २०२५ जाहीर रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) मस्कावद बु||ता.रा...
सौ.शोभा वारके यांना राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार २०२५ जाहीर
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
मस्कावद बु||ता.रावेर येथील ग्रामपंचायत सदस्या सौ.शोभा अंबादास वारके यांना राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था जळगाव यांच्या कडून सामाजिक, महिला ग्रामविकास विषयक व अन्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी लक्षात घेता त्यांना संस्थेतर्फे राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार २०२५जाहीर करण्यात आला. तशा आशयाचे पत्र त्यांना नुकतेच संस्था अध्यक्षा सौ.संदिपा ज्ञानेश्वर वाघ यांचे कडून प्राप्त झाले आहे.येत्या २८ सप्टेंबर रोजी त्यांना हा पुरस्कार जळगाव येथील अल्पबचत भवन या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.

No comments