adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

स्थानिक गुन्हे शाखेचा सापळा स्कॉर्पीओत विक्री करता चालवलेला गांजा पकडला..

  स्थानिक गुन्हे शाखेचा सापळा स्कॉर्पीओत विक्री करता चालवलेला गांजा पकडला..  सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अहिल्यानगर :...

 स्थानिक गुन्हे शाखेचा सापळा स्कॉर्पीओत विक्री करता चालवलेला गांजा पकडला.. 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर :- जिल्ह्यातील शेवगाव येथे विक्रीकरता आणलेला 11.083 किलो ग्रॅम गांजासह एकुण 13 लाख 70,500/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे  पथक हे पाथर्डी पो.ठाणे हद्दीत अंमली पदार्थाबाबत माहिती घेत असतांना,पथकांस गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की,इसम नामे 1)सतिष सुरेश डोळस रा.मावळ, पुणे,2)राकेश सुदाम वाळुंज रा. मावळ, ता. पुणे, 3)आकाश देविदास जंगम रा.कामशेत, पुणे, 4) सतिष कृष्णकुमार बिडलांग रा.कारला,मावळ,पुणे हे त्यांचे कडील काळे रंगाची स्कॉर्पीओ गाडी क्रमांक एम.एच.12 जे. झेड 1854 ही मधुन इसम नामे 5)सुरज आसराजी छाजेड रा. बालमटाकळी,शेवगांव याचे कडुन अंमली पदार्थ गांजा खरेदी करुन विक्री करिता शेवगांव येथुन पाथर्डी मार्गे पुणे परिसरामध्ये जाणार असल्याची माहिती मिळाली,त्यानुसार पथकाने तात्काळ पाथर्डी पोलीस ठाणे येथे येवुन पोनि.श्री.पुजारी यांना मिळालेल्या बातमीचा लेखी रिपोर्ट दिला असता,पोउपनि/महादेव गुट्टे,पोकॉ/277 इजाज महेबुब सय्यद,पोहेकॉ/1309 अल्ताफ अहमद शेख,नेम. पाथर्डी पोलीस ठाणे यांच्यासह  कारवाई करण्याकरीता आवश्यकत्या साहित्यासह पोलीस स्टेशन मधुन सरकारी व खाजगी वाहनाने निघुन पाथर्डी ते शेवगांव जाणारे रोडवरील माळी बाभुळगांव फाटा या ठिकाणी सापळा रचुन बातमीतील नमुद काळे रंगाची स्कॉर्पीओ गाडी क्रमांक एम.एच. 12 जे झेड 1854 ताब्यात घेतली, नमुद स्कॉर्पीओ मध्ये 04 इसम यांना पोलीस स्टाफ,पंचाची ओळख समजावुन सांगितली सदरील इसमांचे ताब्यातील स्कॉर्पीओ गाडीची झडती घेता सदर गाडीचे पाठीमागील डिकीमध्ये निळे रंगाची ट्रॅव्हल बॅग मिळुन आली. सदर बॅग उघडुन पाहाता आतमध्ये दोन मोठ्या प्लॅस्टीक पिशव्यामध्ये उग्र वास येत असलेला व मिश्रीत असलेला हिरवट रंगाचा पाला,फुले,बोंडे काड्या संलग्न असलेले कॅनबिस वनस्पतीचे शेंडे (अंमली पदार्थ गांजा) मिळुन आला.त्यांना विचारणा केली असता,इसम नामे सतिष सुरेश डोळस यांने तो गांजा हा अंमली पदार्थ असल्याचे सांगुन तो नशेसाठी वापरला जातो व सदरचा गांजा हा इसम नामे 5)सुरज आसराजी छाजेड रा.बालमटाकळी, शेवगांव,जि.अहिल्यानगर यांचे कडून खरेदी करुन, वरिल आरोपी 1) ते 4) यांनी विक्रीकरीता आणलेला असल्याचे सांगितले. नमुद आरोपी ताब्यात घेवुन, आरोपींकडून एकूण 13,70,500/- रुपये किमंतीचा अंमली पदार्थ गांजा व वाहन जप्त करण्यात आले आहे.

ताब्यातील आरोपी नामे 1) सतिष सुरेश डोळस वय 27 वर्षे, रा. कान्हेफाटा, इकोव्हॅली सोसायटी, सी 505, मावळ, ता. मावळ, जि. पुणे, 2) राकेश सुदाम वाळुंज वय - 35 वर्षे, रा. इंद्रायणी कॉलनी, कामशेत, ता. मावळ, जि. पुणे, 3) आकाश देविदास जंगम वय - 29 वर्षे, रा. कामशेत, ता. मावळ, जि. पुणे, 4) सतिष कृष्णकुमार बिडलांग वय - 33 वर्षे, रा. कारला, ता. मावळ. जि. पुणे, 5) सुरज आसराजी छाजेड रा. बालमटाकळी, शेवगांव, जि. अहिल्यानगर (फरार) यांचे विरुध्द स्थानिक गुन्हे शाखेचे पोकॉ.बाळासाहेब सुभाष खेडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पाथर्डी पो.ठाणे, अहिल्यानगर येथे गु.र.नं. 1103/2025 गुंगीकारक औषधीद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा सन 1985 चे कलम 8 (क),20(ब), ii(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपी क्र.1 ते 4 आणि गुन्हयात एकूण 13,70,500/- रुपये किंमतीचा मुद्देमाल पाथर्डी पो.ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले असून, पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशन करीत आहे.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक श्री. वैभव कलुबर्मे,उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगांव उपविभाग,श्री.निरज राजगुरु, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनास सूचनेनुसार पोउपनि/अनंत सालगुडे,पोहेकॉ/अतुल लोटके, पोहेकॉ/संतोष खैरे,पोना/ बाळासाहेब नागरगोजे,पोना/ सोमनाथ झांबरे,पोकॉ/किशोर शिरसाठ स्थानिक गुन्हे शाखा,आणि श्री.विलास पुजारी, पोलीस निरीक्षक,पाथर्डी पो.ठाणे  व पाथर्डी पो.ठाणेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

No comments