साताऱ्यात दोन मुलींसह गर्भवती महिलेची आत्महत्या.. एका चिमुकलीचा जीव वाचला; सातारा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद..!! सौ. कलावती गवळी ( साता...
साताऱ्यात दोन मुलींसह गर्भवती महिलेची आत्महत्या.. एका चिमुकलीचा जीव वाचला; सातारा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद..!!
सौ. कलावती गवळी ( सातारा जिल्हा ) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सातारा तालुक्यांतील परळी खोऱ्यात कारी येथे ऐंन गणेशोत्सवांच्या सणासुदीत मन हेलावणारी घटना घडली आहे. गर्भवती महिलेने आपल्या चिमुकल्या दोन मुलींसह विहिरीत उडी घेवुन आत्महत्या केली आहे. यामध्ये एका मुलीचा दुर्दैवी अंत झाला आहे. विहिरीतील एका फांदीला पकडून ठेवल्याने एका चिमुरडीला जीव वाचवता आला. या घटनेत गर्भातील बाळही दगावले. या घटनेने परळी खोऱ्यातून हळहळ व्यक्त होत आहे. ऋतुजा विशाल मोरे (वय 27 ) स्पृहा विशाल मोरे (वय 3 ) अशी मृत्यू झालेल्या मायलेकींची नावे आहेत. त्रिशा विशाल मोरे (वय 6) असे बचावलेल्या चिमरडीचे नाव आहे. सौ. ऋतुजा विशाल मोरे हिचे पती विशाल मोरे हे आपल्या परिवारांसह वास्तव्याला आहेत. एक्सपोर्ट इनपोर्टचा त्यांचा छोटा व्यवसाय आहे. गणेशोत्सवामुळे ते आपल्या कुटुंबासह कारी येथे आले होते. गणेशोत्सवानंतर ते पुन्हा मुंबईला परत जाणार होते. मात्र गुरुवारी एका अनपेक्षित घटनेने कुटुंबाची अक्षरश: वाताहत झाली. कौटुंबिक वादांतून ऋतुजा ने हे टोकाचे पाऊलं उचलले असावे कयास पोलिसांकडूंन बांधला जात आहे. या घटनेने परळी खोरे हेलावून गेले आहे. या घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे . कारी येथील घटनेप्रकरणी मृत महिलेच्या माहेरील लोकांनी जाचहाटाची तक्रार केली आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेचा तपास करून पोलीसांनी दोषींवर कारवाई करावी अशी मागणी माहेरीलकडील लोकांनी केली आहे.

No comments