कुंभमेळा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश भाऊ महाजन यांची त्र्यंबकेश्वरला भेट प्रतिनिधी- जयवंत हागोटे त्रंबकेश्वर (संपादक -:- हेमकांत गा...
कुंभमेळा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश भाऊ महाजन यांची त्र्यंबकेश्वरला भेट
प्रतिनिधी- जयवंत हागोटे त्रंबकेश्वर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी त्र्यंबकेश्वर येथील जुना आखाडा येथे भेट देऊन साधुसंतांच्या समस्येचे तात्काळ निवारण केले. त्र्यंबकेश्वर नगरीत होणाऱ्या विकास कामा संदर्भात व नागरिकांना उद्भवणाऱ्या समस्यांबाबत कुंभमेळा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्याशी भाजपा पदाधिकारी यांनी चर्चा केली.
कुंभमेळ्यात त्र्यंबकेश्वर शहरात होणारे रस्ते संपूर्ण खोदून नवीन करण्यात यावे तसेच वारंवार उद्भवणाऱ्या पुराच्या समस्यातून मुक्त होण्यासाठी रिव्हर-सिवर योजनेची अंमलबजावणी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.जिल्हाधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांना सूचना करून कुंभमेळ्याच्या कामात हे सर्व काम समाविष्ट करावे असे आदेश यावेळी मंत्री महोदयानी दिले आहे.
नवरात्री निमित्त गिरीश महाजन यांनी नीलंबिका मातेचे मनोभावे दर्शन घेतले यावेळी त्यांचे नारळ पुष्पहार व शाल भेट देऊन नीलंबिका मातेचे पुजारी भाजपा तालुका प्रसिद्धीप्रमुख सतीश दशपुत्रे यांनी त्यांचे स्वागत केले
यावेळी त्र्यंबकेश्वर मधील पूरग्रस्त भागाची पाहणी केली स्थानिक नागरिकांच्या वतीने देखील निवेदन देऊन पुराच्या समस्येतून मुक्त करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. पुढच्या वर्षी पुराची समस्या राहणार नाही असे आश्वासन मंत्री महोदयांनी यावेळी दिले. यावेळी आखाडा परिषदेचे साधू संत, तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते.
No comments