सातारा पोलिसांच्या नवीन घरांचे दिवाळीत केले जाणार वाटप; जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची माहिती..!! सौ. प्रियांका देशमुख ( सातारा ज...
सातारा पोलिसांच्या नवीन घरांचे दिवाळीत केले जाणार वाटप; जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची माहिती..!!
सौ. प्रियांका देशमुख ( सातारा जिल्हा ) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सातारा पोलिसांचा गेल्या दीड वर्षापासून निवासस्थानाचा प्रश्न काही तांत्रिक कारणांस्तव चांगलाच ऐरणीवर आला होता. आता मात्र पोलिसांच्या चेहऱ्यावर आनंदाचे अश्रूं दिसून येणार आहेत. दिवाळीपूर्वीच सातारा पोलिसांच्या नवीन गृहनिर्माण संकुलामध्ये सदनिकांचे येत्या दिवाळीपूर्वींच वितरण केले जाणार आहे. यामध्ये 693 सदनिकांची सोडत काढली जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. दरम्यान सातारा शहरांतील वाढत्या अवैध व्यवसायाचा संदर्भात कठोर कारवाया सुरूच आहेत. आपण असे काही आढळल्यास आपणही आम्हांला माहिती देऊ शकता असे आव्हान पोलीस अधीक्षकांनी केले आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सातारा जिल्ह्यातील पोलिसांच्या कामगिरीचा शिवतेज हॉलमध्ये सविस्तर आढावा घेतला या आढाव्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची कायदा आणि सुव्यवस्था व गुन्ह्यांच्या अनुषंगाने शिवतेज हॉल येथे शनिवारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर सहा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी पुढे म्हणाले की सातारा पोलीस दलाने जिल्ह्यातील जवळपास 6 टोळ्याला मोक्काची कारवाई केली असून अजूनही तीन टोळ्यांवर कारवाईचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. तसेच सातारा पोलीस दलाने विविध गुन्ह्यांच्या तपासात कामात चांगलीच कामगिरी केली आहे. सातारा पोलीस नेहमीच प्रयत्नशील, त्याबद्दल मी सातारा पोलिसांचे विशेष कौतुक करीन असेही विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे.
No comments