चोपडा येथे भारतीय बौध्द महासभा वतीने वर्षावास कार्यक्रम संपन्न चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा येथे दि.बुद्धिस्ट...
चोपडा येथे भारतीय बौध्द महासभा वतीने वर्षावास कार्यक्रम संपन्न
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा येथे दि.बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा चोपडा तालुक्याच्या वतीने आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा वर्षवास कार्यक्रम जिल्हाच्या व राज्याच्या नियोजनानुसार सुरू असून आज वर्षवास पुष्पमाला क्रमांक पंधरा कार्यक्रम संपन्न झाला,आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शालिकग्राम व्यंकट करंदीकर हे होते. सदर वर्षवास मालिकेचे उदघाट्न जानकीराम सपकाळे व सुदाम करंकाळ यांनी त्रिशरण, पंचशील, बुद्ध वंदना म्हणून केले.
आजच्या वर्षवास विषय कलाम सूत्त -मानव मुक्तीचा मार्ग यावर प्रवचनकार सुदाम रामदास करंकाळ यांनी सखोल असे धम्म देसना दिली.वर्षावास कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन भरत भिमराव शिरसाठ यांनी केले.
सदर कार्यक्रमास सुदाम रामदास करंकाळ ,बापूराव वाणे,भरत शिरसाठ,शालिकग्राम करंदीकर जानकीराम सपकाळे,सुदाम ईशी,वसंत शिंदे,,इतर बौध्द उपासक, उपस्थित होते.

No comments